Politics
Politics 
पुणे

Vidhan Sabha 2019 : स्थानिक जाहीरनाम्यांबाबत उदासीनताच

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - मतदानासाठी अवघे सात दिवसच राहिले असतानाही शहर विकासाचा जाहीरनामा प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे स्थानिक मुद्द्यांची दखल पक्ष घेणार का, याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्यावेळी एरवी राजकीय पक्ष शहरात कोणती विकासकामे करणार, याबाबतचा जाहीरनामा प्रचारादरम्यान प्रसिद्ध करीत असतात. परंतु, यंदाच्या  निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे सात दिवसच राहिले आहेत. परंतु भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडी, आम आदमी पार्टी आदी पक्षांनी संपूर्ण शहराचा समग्र विचार करून विकासाची दिशा मतदारांसाठी अद्याप स्पष्ट केलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीने राज्याचा जाहीरनामा तयार केला असून, त्याचे प्रकाशन मुंबईत नुकतेच झाले. तर, भाजपने शहर विकासाबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. प्रत्येक मतदारसंघाचा जाहीरनामा तयार करण्याचे नियोजन असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. तर शिवसेना, मनसे आपापली भूमिका लवकरच जाहीर करणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. 

शहरात वाहतूक, प्रदूषण, कचरा, पिण्याचे पाणी, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य, परवडणारी घरे, शिक्षण, स्टार्टअप आदीअनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठीचा ‘रोड मॅप’ राजकीय पक्ष पुणेकरांपुढे निवडणूक प्रचारादरम्यान सादर करतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात राजकीय मुद्द्यांवरच राजकीय पक्षांचा भर असल्याचे सध्या दिसत आहे.

 शहर विकासाचा जाहीरनामा मतदारांसमोर न मांडता निवडणूक लढविणे, हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले नाही. राजकीय पक्षांनी मतदारांना गृहीत धरले आहे, असे त्यातून दिसत आहे. त्यामुळे शहरातील समस्या आणि विकासाचे मुद्दे, या मूळ मुद्द्यांपासून प्रचार भरकटत आहे.
- डॉ. संजय जैन, प्राध्यापक

रस्त्यांवरचे प्रश्‍न सामान्य माणसांसाठी महत्त्वाचे आहेत. प्रदूषण, अतिक्रमणे, कचरा, आरोग्य आदींशी संबंधित समस्या सोडविण्याची नेमकी दिशा काय असेल, हे मतदारांना समजले पाहिजे. पण कोणताही राजकीय पक्ष त्याकडे लक्ष देत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. 
- ॲड. माधवी राहिरकर, डेक्कन जिमखाना परिसर समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT