shivajirao-adhalrao-patil
shivajirao-adhalrao-patil 
पुणे

Vidhan Sabha 2019 : शहर विकसित करणारा ‘भोसरी २०२०’ संकल्प - शिवाजीराव आढळराव

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमदार महेश लांडगे यांचा ‘भोसरी व्हिजन २०२०’ हा संकल्प शहराला आणखी वेगाने विकसित करणारा ठरेल,’’ असा विश्‍वास शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी व्यक्त केला.  

भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आढळराव म्हणाले, ‘‘लांडगे यांनी भोसरीच्या विकासाचे स्वप्न पाहत हाती घेतलेला इंद्रायणी सुधार प्रकल्प, नाशिक फाटा ते चाकण, पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्प, मल्टिमोडल हब, वेस्ट टू एनर्जी, देहू-आळंदी-पुणे पालखी महामार्ग, संविधान भवन, संतपीठ, सफारी पार्क, भक्ती-शक्ती चौकातील तीन मजली उड्डाण पूल, स्पोर्टस सिटीच्या दृष्टीने इंद्रायणीनगर, गवळीनगर, भोसरी गावजत्रा मैदान, मोशी-चिखली-प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी येथे विकसित केलेले क्रीडा प्रकल्प, नामांकित शिक्षण संस्थांसाठी प्राधिकरण परिसरात जागा उपलब्ध करून देण्याची धडपड, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व स्मार्ट सिटीच्या दृष्टीने त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे.’’ 

विकासाचे मॉडेल म्हणून चऱ्होली गावाचा कायापालट होणार आहे. आरोग्य सुविधेसाठी उभारलेले नूतन भोसरी रुग्णालय, भोसरी परिसराचा ग्रीन बेल्ट विकसित करण्यासाठी ग्रीन भोसरी क्‍लीन भोसरी प्रकल्प आणि उद्याने व क्रीडांगणासाठी उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधा, आंद्रा-भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना अशा अनेक योजनांची आठवणही आढळराव यांनी करून दिली; तसेच इंद्रायणी थडीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी टाकलेले पाऊल महत्त्वाचे व ऐतिहासिक आहे.

त्याबरोबरच नागरिकांचे दैनंदिन प्रश्न हातावेगळे करण्यासाठी राबविलेल्या परिवर्तन हेल्पलाइनच्या उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक अल्पावधीत होत आहे, असा विश्‍वासही व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT