स. प. महाविद्यालय - भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची गुरुवारी सभा होणार आहे. या सभेसाठी मैदानातील कापलेली झाडे. 
पुणे

Vidhan Sabha 2019 : मोदींच्या पुण्यातील सभेचा गुरुवारी षटकार

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - पंतप्रधान झाल्यानंतर २०१४ पासून नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी (ता.१७) सहाव्यांदा पुण्यात येत आहेत. याआधी विविध कार्यक्रमांनिमित्त मोदींनी पाच वेळा पुण्याला भेट दिली. आता विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ते येत असून, त्यासाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. या वेळी  मोदी कोणता षटकार ठोकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सभेचे मैदान भरविताना स्थानिक नेतृत्वाच्या नाकीनऊ आले आहे. ‘रिस्क’ नको म्हणून सभेसाठी गर्दी जमविण्याचे फर्मान नेतृत्वाने पक्षाच्या उमेदवार व नगरसेवकांना सोडले आहे. या सभेचा फायदा घेण्याच्या उद्देशाने कसबा पेठ, कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वती मतदारसंघातील उमेदवार व नगरसेवकांवर गर्दीची भिस्त सोपविली आहे. 

उमेदवारांना प्रत्येकी पाच हजार जणांना अणण्याचे उद्दीष्ट देण्यात आल्याचे समजते. नगरसेवकांना प्रत्येकी चारशे ते साडेचारशे जणांना सभेच्या ठिकाणी आणण्याचे उद्दिष्ट दिले असून, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनाही ‘वाटेल ते करा; पण गर्दी करा,’ असा आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. मात्र, निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने गर्दी जमविण्याचे आव्हान राजकीय पक्षांपुढे आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजप नेत्यांच्या बैठकीत गर्दीच्या मुद्यावर प्राधान्याने चर्चा करून संपूर्ण मैदान भरविण्याचा निर्धार करण्यात आला.

दिल्लीच्या टीमचे लक्ष
सभा यशस्वी करण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या टीमसह दिल्लीतील विशेष टीम पुण्यात आली आहे. ही टीम सुरक्षिततेसह व्यासपीठाची रचना, लोकांच्या बसण्याची व्यवस्था आणि गर्दीकडे लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी ते पुण्यातील भाजप नेत्यांसोबत चर्चा करीत आहेत. दरम्यान, मोदी यांच्या सभेसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

‘सप’मधील झाडे सपासप कापली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानातील २० ते २५ झाडे कापली आहेत. निवडणूक प्रचारासाठी येत्या गुरुवारी मोदी यांची पुण्यातील सभा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

महाविद्यालयाच्या मैदानात समोरच्या बाजूला व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. व्यासपीठ उभारण्यात अडथळा येत असल्यामुळे ही झाडे तोडण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. काही झाडे निम्म्यापर्यंत तोडली आहेत, तर काही झाडांचा केवळ बुंधा शिल्लक आहे. तर काही झाडे पूर्णपणे काढण्यात आली आहेत. अशी वीस ते पंचवीस झाडे तोडण्यात आली आहेत.

 १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनादेश यात्रा पुण्यात आली होती. या यात्रेच्या निमित्ताने सिंहगड रस्त्यांवरील झाडे तोडण्यात आली होती. त्या वेळी हा चर्चेचा विषय झाला होता. मुख्यमंत्र्यांनीही यांची गंभीर दखल घेऊन कारवाई करू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र त्याचे पुढे काय झाले हे अद्याप गुलदस्तातच आहे.

नेत्यांसाठी झाडांचा बळी
नेत्यांच्या दौऱ्यासाठी महिन्यात दुसऱ्यांदा झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. यावरील आपले मत अवश्‍य कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Government : "मतमोजणी अचानक पुढे ढकण्याच्या निर्णयाला फडणवीस सरकार जबाबदार", विरोधकांचा गंभीर आरोप

Beed Accident: गेवराईत भीषण अपघात; ट्रॅक्टरची जोरदार धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीत ११.३० पर्यंत १७.५७% मतदान

Akot News : रोजगाराच्या शोधात मजुरांचे स्थलांतर; वीटभट्ट्यावर सर्वाधिक मजूर

Winter Lungs Health: हिवाळ्यात फुफ्फुसांची काळजी कशी घ्याल? डॉक्टरांनी सांगितले निरोगी राहण्याचे सोपे उपाय

SCROLL FOR NEXT