शिवाजीनगर रेल्वे स्थानक - कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी पदयात्रेद्वारे मतदारांशी संपर्क साधला.
शिवाजीनगर रेल्वे स्थानक - कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी पदयात्रेद्वारे मतदारांशी संपर्क साधला. 
पुणे

Vidhan Sabha 2019 : स्टेशन परिसरातील प्रश्‍न सोडविणार - बहिरट

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतुकीची समस्या दूर करण्याबरोबरच या परिसरातील नागरिकांच्या समस्याही सोडविण्याकडे जातीने पाठपुरावा करणार असल्याचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी या परिसरातील रहिवाशांशी संवाद साधताना सांगितले. 

शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. त्याचा मनस्ताप येथील स्थानिक नागरिकांना होतो. याच परिसरात शाळाही आहेत. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागते. याच परिसरात एसटी स्थानकही आहे. या परिसरातील समस्या दूर करण्याकडे आमदारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या भागातील वाहतुकीची समस्या सुटण्याऐवजी वाढतच गेली, असा आरोपही त्यांनी केला. 

बहिरट यांनी आज शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात पदयात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला. विष्णुकृपा वसाहत, इराणी वसाहत, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन झोपडपट्टी परिसरात त्यांची पदयात्रा पार पडली. 

या पदयात्रेस येथील स्थानिक रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यांच्यासमवेत माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, उदय महाले, विजय आल्हाट, माजी नगरसेविका आशा साने, राहुल भोसले, राजू साने, हनुमंत म्हेत्रे आदी कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.

रिक्षाचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी बहिरट सातत्याने प्रयत्न करत आहेत, त्यामुळे पुणे शहर रिक्षाचालक संघटनेतर्फे त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुधीर शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT