Rally
Rally 
पुणे

Vidhan Sabha 2019 : प्रचाराला या, दीड हजार घ्या!

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - पैसे घेऊन प्रचारात सहभागी होणाऱ्यांची शहरातील एका मतदारसंघात चांदी होत आहे. इतर मतदारसंघांत तीनशे ते पाचशे रुपये रोज मिळत असताना या मतदारसंघात मात्र दीड हजारापर्यंत रोकडा मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराचा हा ‘दिलदारपणा’ शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. सभा, पदयात्रांबरोबरच पत्रके वाटपाची लगबग सुरू आहे. त्यासाठी माणसांची मोठ्या प्रमाणावर गरज पडत आहे. पैसे देऊन माणसे आणणे हे आता नवीन राहिले नाही; परंतु त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशावरून सध्या शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे.

शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. सर्वच मतदारसंघांत सध्या हा धंदा जोरात सुरू आहे; परंतु एक मतदारसंघ हा सध्या प्रचारासाठी जाणाऱ्यांच्या दृष्टीने लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघात महिलांना सातशे, तर पुरुषांना दीड हजार रुपये दर ठरला आहे. त्यामुळे हा विषय चर्चेचा झाला आहे. वास्तविक ज्या उमेदवाराकडून हा ‘दिलदारपणा’ दाखविला जात आहे, त्याच्यासाठी हा मतदारसंघ अत्यंत ‘सेफ’ म्हणून ओळखला जातो. असे असतानाही याची गरज काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. विविध कारणांमुळे चर्चेत असलेला हा उमेदवार यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

पदयात्रेत गुन्हेगारांचा सहभाग
सुशिक्षित मतदारसंघातील एक उमेदवार सध्या अनेक कारणांनी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या उमेदवाराच्या पदयात्रेत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे मतदारसंघात हादेखील चर्चेचा विषय झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT