वडगाव शेरी - भाजप महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्या प्रचारार्थ कळस भागात काढलेली रॅली.
वडगाव शेरी - भाजप महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्या प्रचारार्थ कळस भागात काढलेली रॅली. 
पुणे

Vidhan Sabha 2019 : वडगाव शेरी : वडगाव शेरीच्या मनात भाजप - मुळीक

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : वडगाव शेरी - ‘वडगाव शेरी मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची विकासकामे केली आहेत. यामुळे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नागरिकांचा मला उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील मतदारांच्या मनात भाजपच आहे,’’ असे मत भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले. 

मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांनी आज कळस भागात प्रचारार्थ पदयात्रा काढली. या वेळी ते बोलत होते. माजी आमदार बापूसाहेब पठारे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, नगरसेवक संजय भोसले, अनिल टिंगरे, फरजाना शेख, नाना सांगडे, ऐश्वर्या जाधव, आनंद गोयल, अशोक कांबळे, चंद्रकांत टिंगरे, किरण भालेराव, राजू साखरे, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांमध्ये मतदारसंघातील भाजपची ताकद वाढली आहे. भाजप-शिवसेना आणि रिपाइंच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काम चांगले आहे. यामुळे प्रचारादरम्यान सर्व प्रभागातून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’ 

माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. वडगाव शेरीमध्ये केलेल्या शाश्वत विकासकामांमुळे माझा विजय निश्‍चित आहे. विरोधकांना पराभव दिसू लागल्याने ते खोट्या अफवा पसरवण्याचे काम करत असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT