Police-Bandobast
Police-Bandobast 
पुणे

निवडणुकीत पोलिसांवर येणार ताण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - सण-उत्सव यासह निवडणूक काळात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून महासंचालक कार्यालयाकडे अतिरिक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुमक देण्याची मागणी केली जाते. मागणीप्रमाणे कुमक उपलब्ध झाली नाही, तरी काहीप्रमाणात अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी दिले जातात. मात्र, या वेळी विधानसभा निवडणूक राज्यभरात एकाच टप्प्यात एकाचदिवशी होत असून या कालावधीत राज्यभरात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. अशातच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे अगोदरच मनुष्यबळाची कमतरता असताना व अतिरिक्त कुमक न मिळाल्यास आयुक्तालयातील पोलिसांवर ताण येणार आहे.   

२१ ऑक्‍टोबरला राज्यभरात मतदान व २४ ऑक्‍टोबरला मतमोजणी आहे. सोमवारी (ता. ७) उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर राजकीय सभा, रॅलींचा धडाका सुरू होणार आहे. दरम्यान, ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड, भोर-वेल्हा-मुळशी या विधानसभा मतदारसंघांचा भाग समाविष्ट आहे. या हद्दीत कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. 

दरम्यान, पोलिस महासंचालक कार्यालयाकडे अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी केली आहे. मात्र, राज्यात सर्वत्रच एकाच दिवशी निवडणूक असल्याने पिंपरी-चिंचवडला किती बंदोबस्त मिळणार, याबाबत स्पष्टता नाही. अधिक बंदोबस्त मिळाल्यास सोयीचे होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. दरम्यान, निवडणूक बंदोबस्त, नाकाबंदी; तसेच रोजचे पोलिस ठाण्यातील कामकाज, गुन्ह्यांचा तपास यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर ताण येणार आहे. आता एकाच टप्प्यात एकाचदिवशी सर्वत्र निवडणूक होत असल्याने अतिरिक्त बंदोबस्त मिळणार की, सध्या आयुक्तालयाकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावरच निवडणुकीला सामोरे जावे लागणार याबाबत अनिश्‍चितता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT