पुणे

पाणी असूनही पाणी नाही, योजना असूनही लाभ नाही. (सीना-माढा योजनेला दोन महिने; टेलकडील गावांचा मात्र पाणीप्रश्न ‘जैसे थे’!)

CD

PNE26W45936
‘एआय’ इमेज
---
धरण उशाला; मात्र टेलकडील गावे तहानलेलीच
सीना-माढा योजना सुरू होऊन दोन महिने; पिके करपली, विहिरी-बोअरवेल तळाला
अक्षय गुंड : सकाळ वृत्तसेवा
उपळाई बुद्रूक, ता. ३० : सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटले, तरी टेलकडील गावांपर्यंत पाणी पोचलेच नसल्याने माढा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. एकीकडे उजनी धरण तुडुंब भरलेले असताना धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
पावसाने मोठी ओढ दिल्याने पूर्व भागातील पाणी स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उपळाई बुद्रूक, उपळाई खुर्द, वडाचीवाडी आणि रोपळे खुर्द परिसरातील पिके पाण्याअभावी करपून गेली असून, विहिरी व बोअरवेलनी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतीबरोबरच आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. सीना-माढाचे पाणी तातडीने मिळाले नाही, तर या भागात टँकर सुरू करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
टेलकडील भागाला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार उपोषणे व आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले. चर्चा आणि आश्वासने मिळाली; मात्र परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे ‘आश्वासनांचा पाऊस पडतोय, पण पाण्याचा थेंबही नाही,’ अशी संतप्त भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
योजनेच्या पाणीवाटपाचे नियोजन, प्रवाहाचे व्यवस्थापन आणि टेलपर्यंत पाणी पोचवण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोन महिने उलटूनही टेलपर्यंत पाणी पोचत नसेल, तर योजना नेमकी कोणासाठी आणि कुणाच्या नियोजनावर चालवली जात आहे, असा सवाल शेतकरी करत आहेत.
या परिस्थितीसाठी प्रशासनासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. निवडणुकीच्या काळात पाण्याचे प्रश्न अग्रक्रमाने मांडणारे लोकप्रतिनिधी संकटाच्या काळात प्रशासनाला किती प्रभावीपणे धारेवर धरतात, याची आता परीक्षा असल्याचे बोलले जात आहे.
‘पाणी असूनही पाणी नाही, योजना असूनही लाभ नाही आणि आंदोलने करूनही तोडगा नाही,’ अशी टेलकडील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे कागदी नियोजन आणि आश्वासनांपलीकडे जाऊन प्रशासनाने टेलकडील गावांना तातडीने पाणी सोडावे; अन्यथा वाढत्या पाणीटंचाईची जबाबदारी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी स्वीकारावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांमधून होत आहे.
---
कोट
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वांनाच पाण्याची गरज आहे. मात्र, एकाच वेळी सर्वांना पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत. तरीदेखील नियोजन करण्यात येत आहे. याबाबतचे अधिक नियोजन उपकार्यकारी अभियंता तुंबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.
- सचिन पवार, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग
---
कोट
पाणी सोडल्याचे सांगितले जाते; पण ते टेलपर्यंत पोचत नाही. वारंवार आंदोलने आणि उपोषणे करूनही फक्त आश्वासने मिळतात. प्रशासनाने आता कागदावरचे नियोजन बंद करून प्रत्यक्ष टेलपर्यंत पाणी पोचवावे.
- गोरख वाकडे, शेतकरी, उपळाई बुद्रूक
---
कोट
विहिरी आणि बोअरवेल तळाला गेले आहेत. शेती तर हातची गेलीच, पण आता पिण्याच्या पाण्याची चिंता लागली आहे. सीना-माढाचे पाणी तातडीने मिळाले नाही तर गावात टँकर सुरू करण्याची वेळ येईल.
- बसवराज आखाडे, नागरिक, उपळाई बुद्रूक
---
कोट
आम्ही आंदोलन केले, उपोषण केले, अधिकाऱ्यांना निवेदने दिली. प्रत्येक वेळी आश्वासन मिळते; मात्र प्रत्यक्ष पाणी मिळत नाही. टेलकडील शेतकरी नेमका कोणाच्या भरवशावर जगायचा?
- रानबा कदम, शेतकरी, उपळाई खुर्द
---
कोट
योजनेचे पाणी वरच्या भागात पोचते, मग टेलकडील गावांचाच काय दोष? पाणीवाटपात ‘टेल टू हेड’ पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढेल.
- सोमनाथ राऊत, शेतकरी, वेताळवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Maintenance : कर्मचाऱ्यांना झटका ! पत्नीला पोटगी दिली नाही तर थेट पगारातून कपात; सरकारचा मोठा निर्णय

Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

Bhimashankar Route: घोडेगाव-भीमाशंकर रस्ता खड्डेमय, अंगणवाडी पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करा : सुप्रिया सुळे

Marathi News Live Updates : उत्तर सायप्रसजवळ २७० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली

SCROLL FOR NEXT