पुणे

राज्यातील धरणांत ३४ टक्के पाणीसाठा

CD

पुणे, ता. १९ : राज्यातील सर्व विभागांतील सुमारे तीन हजारांहून अधिक धरणांमध्ये सध्या केवळ सुमारे ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाणीसाठा म्हणजे ४४.३९ टक्के अमरावती विभागात असून, सर्वांत कमी पाणीसाठा म्हणजे २५.२६ टक्के पुणे विभागात आहे. मागील वर्षीपेक्षा पाणीसाठा समाधानकारक असला, तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभाग मिळून एकूण तीन हजार २८ मोठे, मध्यम व लघु प्रकल्प आहेत. त्यातही सर्वात जास्त प्रकल्प छत्रपती संभाजीनगर विभागात असून, त्यांची संख्या ९२९ आहे. सर्वांत कमी प्रकल्प कोकण विभागात असून, त्यांची संख्या १७३ एवढी आहे. कडक उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यापासूनच धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच, सिंचन आणि पिण्यासाठीही पाण्याचा वापर वाढल्याने उपसाही वाढला आहे. परिणामी, धरणांमधील पाण्याची पातळी सरासरीपेक्षा खूपच खालावली आहे. पाण्याचा वापर जपून करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने केल्या आहेत.

विभागानिहाय पाणीसाठा (टक्क्यांत)
विभाग--- आजचा --- मागील वर्षीचा
नागपूर ---४२.६६ --- ३३.०४
अमरावती ---४४.३९---३९.३८
संभाजीनगर ---३८.३८--२८
नाशिक --- ३४.६०--- ३१.३६
पुणे --- २५.२६---- २२.२९
कोकण ---- ३७.७६--३८.२५
एकूण ---- ३३.९५--२८.९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वरंध घाटात दरडी कोसळल्या, २७ गाड्यांमध्ये ७० ते ८० प्रवासी रात्रभर अडकले; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, १० दरडी हटवल्या

बाबा गेल्यानंतर आई अचानक एकटी पडली... प्रार्थना बेहरेने सांगितला वडील गेल्यानंतरचा भावुक प्रवास

Latest Marathi News Live Update : आळंदी आणि देहूमध्ये न जाता पुण्यातून पालखीमध्ये सहभागी व्हा, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

Panvel: पनवेलमध्ये दुर्दैवी घटना! गाडेश्वर धरण परिसरात ओढ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Flood: पवना नदीला पूर! जांबे गावात घरांना पाण्याचा वेढा; एनडीआरएफकडून २५ नागरिकांची सुखरूप सुटका

SCROLL FOR NEXT