पुणे

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

CD

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक-शिक्षकेतरांचे आंदोलन
अहिल्यानगर, ता. २ ः जुनी सेवानिवृत्ती योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (१) काळ्या फिती बांधून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी (ता. ५) धरणे आंदोलन, तर २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर सहकुटुंब आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, वारंवार आंदोलने करूनही शासनाकडून या प्रश्‍नावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता आंदोलनाचा टप्पा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १ ते ४ सप्टेंबरदरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती बांधून शाळांमध्ये नियमित शैक्षणिक कामकाज पार पाडणार आहेत. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर २८ सप्टेंबरपासून सहकुटुंब आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मागणी मान्य होईपर्यंत उपोषण करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनावर महेंद्र हिंगे, सुनील भोर, देविदास खेडकर, दिलीप डोंगरे, संजय वाळे, संजय इधे, राज जाधव, सुनील दानवे, संजय भुसारी, राजू पठाण, जाकीर सय्यद, मुकुंद अंचवले, छबूराव फुंदे, बद्रिनाथ शिंदे, सुदाम दळवी, बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब शिंदे, अजित वडवकर आदींच्या सह्या आहेत.
----
चौकट
विविध संघटनांचा पाठिंबा
मुख्याध्यापक संघाचे सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक संघाचे अप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, तसेच शिक्षक भारतीचे अप्पासाहेब जगताप यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन सिंदूर'च्या नायकाकडे राम मंदिराची जबाबदारी, निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा ट्रस्टचे नवे CEO

Dilip Walse Patil : डिंभे-माणिकडोह बोगद्याला विरोध कायम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका, 'थोडा वेळ देऊ, त्यानंतर पुढील रणनीती ठरवू'

Mumbai Sawantwadi Express : आजपासून मुंबई-सावंतवाडी रोजची एक्स्प्रेस धावणार! सीएसएमटी येथे मुख्यमंत्री फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

SCROLL FOR NEXT