Mahavikas Aghadi government insensitive said Devendra Fadnavis
Mahavikas Aghadi government insensitive said Devendra Fadnavis 
पुणे

महाविकास आघाडी सरकार असंवेदनशील - देवेंद्र फडणवीस 

सकाळवृत्तसेवा

लोणावळा :  मागच्या पाच वर्षात शिवसेनेचा आरोग्यमंत्री होता. भंडारा येथील रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेकरीता दीड कोटी रुपयांची मागणी करूनही महाविकास आघाडी सरकार दहा महिन्यांत कार्यवाही करू शकले नाही. बिल्डरचे प्रश्न, प्रिमियम व रेडी रेकनरचा विषय असेल तर हे सरकार धावाधाव करते, त्यांचे प्रश्न लगेच मार्गी लागले जातात. सर्व जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलून मोकळे होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः भंडाऱ्यास भेट दिली मात्र  या  मात्र या घटनेसंदर्भात अद्याप एकही कारवाई झालेली नाही किंवा कुठल्याही पिडितांना वाढीव मदत मिळाली नाही.  हे सरकार असंवेदनशील आणि टोलवाटोलवी करणारे सरकार आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणावळ्यात केली.

भाजप महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा सोमवारी (ता.११) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला , यावेळी श्री. फडणवीस ते बोलत होते.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, खासदार रक्षा खडसे,  लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, अश्विनी जिचकार, विद्या ठाकूर, स्मिता वाघ, माधवी नाईक, निता केळकर, प्रणिता चिखलीकर, दीपाली मोकाशी, कांता नलावडे, सविता कुलकर्णी, सायली बोत्रे आदींसह राज्यभरातून महिला पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - नथुराम गोडसेबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

फडणवीस म्हणाले, ''राज्यात बर्ड फ्लू च संकट हे मोठं संकट येत आहे. लॉकडाऊन मुळे मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करणारे व्यावसायिकांवर विपरित परिणाम झाला आहे. या बर्ड फ्लू च्या संकटावर सरकारने वेगाने कारवाई केली पाहिजे शिवाय कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे.''

शिवसेना गुजराती समाजाला जवळ करत आहे या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले , गुजराती समाजाला निवडणुकीसाठी का होईना समावेश केला जात आहे. एकीकडे शिवसेना अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेन ला विरोध करत आहे. तर दुसरीकडे गुजराती लोकांना जवळ करत आहे हा विरोधाभास आहे अशी टीका फडणवीस यांनी केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे पण आता ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे झाले आहेत. उर्दू कॅलेंडर छापले जात आहे. निवडणुकीसाठी हे सर्व राजकारण केलं जातं आहे. निवडणुकीसाठी ही केवळ नौटंकी चाललीय हे आता लोकांनादेखील समजू लागले आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT