Dr. Amol Kolhe esakal
पुणे

Dr. Amol Kolhe : आगामी विधानसभा निवडणुकीत 'मविआ'ला 200 च्या वर जागा मिळणार; खासदार कोल्हेंना विश्वास

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यातील दीडशे विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मतदारांनी आघाडी दिली आहे.

कृष्णकांत कोबल

नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

हडपसर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यातील दीडशे विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मतदारांनी आघाडी दिली आहे. त्या भीतीने देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) राजीनामा द्यावा लागला. मतदारांकडून मिळत असलेला हा कौल पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला दोनशेच्या वर जागा मिळतील, असा विश्वास नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी व्यक्त केला.

शिरुर लोकसभा मतदार संघाचे (Shirur Lok Sabha Constituency) नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मतदारांचे ऋण व्यक्त करून त्यांच्याशी संवाद साधताना डॉ. कोल्हे बोलत होते.

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण तुपे, काँग्रेसचे मतदारसंघ अध्यक्ष दिलीप तुपे, शिवसेनेचे मतदारसंघ अध्यक्ष राजेंद्र बाबर, माजी उपमहापौर नीलेश मगर, बंडू गायकवाड, सत्कार समारंभाचे संयोजक माजी नगरसेवक योगेश ससाणे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

Manoj Jarange: मोठी दुर्घटना टळली! जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कार्यकर्ता जखमी

H1N1 Virus Delhi: दिल्लीमध्ये H1N1 चा कहर! फ्लू समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Marathi News Live Updates : पुण्यातील मंगळवार पेठेत दिवसाढवळ्या अधिवक्त्यांची दुचाकी चोरी

Ajinkya Rahane : ना रोहित, ना कोहली; निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला पहिला कॉल कुणी केला? म्हणाला, तू आणखी खेळायला हवं होतंस...

SCROLL FOR NEXT