Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Google
पुणे

''मविआचा भ्रष्टाचार बाहेर येत असल्याचे 'पोलखोल'वर हल्ला''

सकाळ वृत्तसेवा

‘महाविकास आघाडीचे सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊ लागल्यामुळे भाजपच्या पोलखोल यात्रेवर हल्ला झाला आहे.

पुणे - ‘महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची (Corruption) प्रकरणे बाहेर येऊ लागल्यामुळे भाजपच्या (BJP) पोलखोल यात्रेवर (Polkhol Yatra) हल्ला (Attack) झाला आहे. मात्र, कितीही हल्ले झाले तरी, ही यात्रा थांबणार नाही, आणखी प्रकरणे बाहेर काढणार आहोत,’ असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी येथे सांगितले.

फडणवीस पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असून त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था काय, असे फडणवीस यांना विचारले असता, राज्य सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारची ती जबाबदारी आहे. तसेच त्या बाबत केंद्रीय यंत्रणा पुरेशी काळजी घेतील, असे त्यांनी सांगितले. तसेच शाल पांघरण्याचा टोला कोणाला होता, असे विचारल्यावर, ज्यांना समजायचे असेल त्यांना समजेल, असेही त्यांनी सांगितले.

पोलखोल यात्रेवर मुंबईत आज हल्ला झाला. त्याबाबत ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे. कोणी कितीही हल्ले केले तरी, ही यात्रा थांबणार नाही. पोलिस कार्यपद्धती, गोपनीय अहवाल या विचारणा केली असता ते म्हणाले की, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजेंडा मांडावा लागत आहे. मात्र, त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून बोलावे, अशी अपेक्षा आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT