Electricitymeter 
पुणे

मीटररीडिंगची एक दिवस आधी सूचना

सकाळवृत्तसेवा

पुणे - मीटररीडिंग आणि वीजबिलात अचूकता व पारदर्शकता राहावी, यासाठी आता मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना महावितरणकडून ग्राहकांना मोबाईलवरून एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.

महावितरणने ऑगस्ट २०१६ पासून मोबाईल ॲपद्वारे मीटररीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात मोठ्या प्रमाणात अचूकता आली आहे. आता वीज मीटररीडिंग प्रक्रियेत ग्राहकांना आपले मीटररीडिंग तत्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाईलवर ग्राहकांना मीटररीडिंगच्या पूर्वसूचनेचा एसएमएस देण्यात येणार असून, यात सकाळी ८ ते १०, १० ते १२ दुपारी १२ ते ३ आणि ३ ते ५ यादरम्यान कोणत्या वेळेत रीडिंग घेतले जाणार आहे, याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार असून, रीडिंग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहून योग्य रीडिंग घेतले जात आहे अथवा नाही, याची खातरजमा करता येणे शक्‍य होणार आहे.

महावितरणने १ मार्च २०१९ पासून राज्यातील गणेशखिंड, रास्ता पेठेसह सहा मंडलांत ग्राहकांना मीटररीडिंगची पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. याशिवाय, महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या इतरही विविध उपक्रमांची माहिती ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर दिली जाते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसेल; अशा ग्राहकांनी आपल्या नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर MREG स्पेस, बारा अंकी ग्राहक क्रमांक अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४x७ सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT