पुणे

पुणे विधानपरिषद निवडणूक

CD

महायुती-आघाडीपुढे
बंडखोरीची डोकेदुखी

विधान परिषद : पुण्यात ‘पदवीधर’साठी ८७, ‘शिक्षक’साठी ६७ अर्ज

पुणे, ता. ६ : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीची लागण झाली. यामुळे दोन्ही मतदारसंघांत चुरस वाढली आहे. बंडखोरी थांबविण्यासाठीचे प्रयत्न पक्ष पातळीवर सुरू झाले आहेत. शुक्रवारी (ता. ९) अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदीप ऊर्फ भैय्या माने यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे. याच मतदारसंघात पक्षाकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शिक्षक मतदारसंघात महायुतीमधील शिवसेनेतच बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याने चिवटे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी याच मतदारसंघातून शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी स्वीय सहाय्यक सचिन सानप आणि शिवसेनेच्या शहर सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत यांनीही अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून शिक्षक मतदारसंघासाठी विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनीही अर्ज दाखल केला.
पदवीधर मतदारसंघासाठी अखेरच्या दिवशी ५४ अर्ज दाखल झाले. त्यामुळे मतदारसंघात आतापर्यंत ८७ अर्ज दाखल झाले आहेत. शिक्षक मतदारसंघात मंगळवारी २९ अर्ज दाखल झाले असून, एकूण अर्जांची संख्या ६७ वर गेली आहे. ‘पुणे पदवीधर’मध्ये पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘पदवीधर’साठी भाजपचे डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे उमेदवार आहेत. तरराष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) पक्षाकडून हर्षदा देशमुख-जाधव यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. मात्र, मंगळवारी ‘राष्ट्रवादी’कडून (शरदचंद्र पवार) प्रदीप माने यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते.

‘शिक्षक’साठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’च्या (शरदचंद्र पवार) आश्‍विनी कदम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. शिवसेनेतही बंडखोरी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. ‘पदवीधर’मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेच्या सचिन बांगर, राणी सुजीत खुर्चे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत अडचण निर्माण केली आहे. ‘मविआ’तील ‘राष्ट्रवादी’ला बंडखोरीची लागण झाली. या पक्षाचे शिवाजी खंडेकर यांनी ‘पदवीधर’मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाऊसाहेब आंधळकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT