महायुतीच्या नेत्यांची साताऱ्यात खलबते
दहा जागांची चर्चा; भाजपकडून जादा जागांची मागणी
सातारा, ता. २ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक आज हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह येथे झाली. या बैठकीत भाजपकडून दहा जागांची मागणी झाल्यामुळे बैठक आटोपती घेण्यात आली. बैठकीतून पालकमंत्री शंभूराज देसाई बाहेर पडले. त्यांनी सर्वकाही मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यावर सोडून निघून गेले.
महायुतीतील प्रमुख नेत्यांची जिल्हा बँकेसंदर्भात बैठक आज रात्री प्रीती एक्झिक्युटिव्ह या हॉटेलवर झाली. या बैठकीला माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार धैर्यशील पाटील, अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही. या बैठकीत राखीव दहा जागांवर चर्चा झाली. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जादा जागांची मागणी झाल्यामुळे यावर निर्णय घेणे अशक्य असल्याने बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. बैठकीची ही पहिली फेरी असून, आणखी काही फेऱ्या होतील, असेही नेत्यांनी सांगितले. या बैठकीतून पालकमंत्री देसाई बाहेर पडले. त्यांनी मंत्री मकरंद पाटील आपल्याला बैठकीतील अधिक माहिती सांगतील, असे सांगून ते निघून गेले.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.