Dilip Walse-Patil sakal
पुणे

माहेर संस्थेचा आदर्श घ्यावा! वळसे पाटील

निराधाराना आधार देऊन माहेर संस्थेने केलेले कार्य कौतुकास्पद आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : निराधाराना आधार देऊन माहेर संस्थेने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक संस्था कशी असावी व त्याचे कार्य कसे असावे यासाठी माहेर एक मूर्तीमंत उदाहरण आहे.अन्य संस्थांनी त्याचा आदर्श घ्यावा. असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

माहेर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त मांजरी - आव्हाळवाडी येथील वात्सल्यधाम मध्ये आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, युक्रांदचे डॉ. कुमार सप्तर्षी, उद्योजक अश्विन मल्होत्रा, मांजरीचे सरपंच स्वप्नील उंदरे, आव्हाळवाडीच्या सरपंच ललीता आव्हाळे, रोहिदास उंदरे, जेष्ठ समाजसेविका व माहेरच्या संस्थापिका लुसी कुरियन, माहेरचे सर्व संचालक,कर्मचारी उपस्तीत होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले,

लुसी कुरियन यांनी समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. यामुळेच माहेर सारखी संस्था उभी राहिली. माहेरचे कार्य केवळ राज्यभर नव्हे तर अन्य राज्यातही सुरू झाले आहे. ही बाब खूपच कौतुकास्पद आहे. यावेळी त्यांनी पाच लाख रुपये संस्थेला देणार असल्याची घोषणा केली. या प्रसंगी संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माहेरवर आधारित स्माईलस्टोन या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. माहेरच्या मुलांनी ढोल ताशा वाजवून उपस्तीत पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक हरिश औचर यांनी केले. सूत्रसंचालन रमेश दुतोंडे व सलीता यांनी केले. तर आभार अनिरुद्ध यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती?

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

Alandi Spiritual Visit: आळंदीत चैतन्यमय वातावरण; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत बिट्टा यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT