पुणे

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत महेश गायकवाड यांना तृतीय क्रमांक

CD

MLG26B03202
माळीनगर (ता. माळशिरस) : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना महेश गायकवाड.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत
गायकवाड यांचा तृतीय क्रमांक
..........
माळीनगर, ता. ४ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत ताम्हाणेवस्ती (ता. माळशिरस) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक महेश गायकवाड यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्यांनी सादर केलेल्या ‘डिजिटल वाचक’ या शैक्षणिक नवोपक्रमाला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली.
‘डिजिटल वाचक’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत झाली असून डिजिटल साधनांच्या साहायाने शिक्षण अधिक सोपे, आकर्षक आणि परिणामकारक बनले आहे. या नवोपक्रमामुळे केवळ त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर इतर विद्यार्थ्यांनाही आधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या यशामागे डाएट अधिव्याख्याता रामदास टोणे, गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर बेंदगुडे, मुख्याध्यापक सिद्धार्थ दुपारगुडे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT