Mahesh Manjrekar sakal
पुणे

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांची रंगभूमीदिनी मुलाखत

मराठी रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांचे विचार ऐकण्याची आणि त्यांचा प्रवास जाणून घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मराठी रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांचे विचार ऐकण्याची आणि त्यांचा प्रवास जाणून घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘सकाळ’ आयोजित मुलाखतीचे. येत्या रविवारी (ता. ५) नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.

सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी, म्हणजे ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन देखील साजरा केला जातो. हे दुहेरी औचित्य साधून मांजरेकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता ही मुलाखत रंगणार असून निवेदक राजेश दामले त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

मुलाखतीनंतर मांजरेकर यांच्या हस्ते सकाळ करंडक स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडेल. नाट्य-चित्रपट रसिकांना महेश मांजरेकर हे नाव सुपरिचित आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ सातत्याने दर्जेदार कलाकृतीमधून ते रसिकांसमोर आले. मराठी नाटकांमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाने त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला.

लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निर्माते अशा विविधांगी भूमिकांमधून त्यांनी मुशाफिरी केली. वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे आणि स्वतंत्र बाण्याचे कलाकार अशी ओळख असलेल्या मांजरेकर यांचे व्यक्तिमत्त्व या मुलाखतीतून उलगडेल.

हे लक्षात ठेवा

कधी : रविवार (ता. ५)

केव्हा : सायंकाळी ५ वाजता

कुठे : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT