पुणे

कऱ्हाड महिमंडणगड मोहिम फत्ते

CD

शिवमुद्रातर्फे महिमंडणगड मोहीम फत्ते

कऱ्हाडच्या ट्रेकर्सकडून गडावर स्वच्छता; भैरी भवानी मंदिरात जलाभिषेक

कऱ्हाड, ता. २१ ः सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या किल्ले महिमंडणगडाची मोहीम कऱ्हाडच्या शिवमुद्रा ट्रेकर्सच्या दुर्गमित्रांनी फत्ते केली. तेथील भैरी भवानी मंदिराची स्वच्छता आणि देवीला जलाभिषेक करण्यात आला.
सातारा ते रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील ऐतिहासिक रघुवीर घाट्यात महिमंडणगड वनदुर्ग आहे. घनदाट जंगल, खोल दऱ्या, उंच डोंगररांगा आणि गडावरील ऐतिहासिक अवशेषांमुळे परिसर दुर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.
जिल्ह्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील मेटसिंदी गावातून गडाकडे जाणारी पायवाट घनदाट जंगलातून जाते. त्या गडाची मोहीम शिवमुद्राने हाती घेतली. गडावर पोचल्यानंतर दुर्गमित्रांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर जलाभिषेक, फुलांची सजावट, नैवेद्य व आरती केली.
मोहिमेदरम्यान गडावर जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक खुणा नसल्याचे निदर्शनास आले. ती गोष्ट लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, भगवे झेंडे व रेबीन लावणे, चुन्याने मार्गाचे मार्किंग करण्याचे काम हाती घेण्याचा निर्धार शिवमुद्राने व्यक्त केला.
गडावर प्लॅस्टिक व कचरा न टाकणे, पाणीसाठे स्वच्छ ठेवणे आणि ऐतिहासिक अवशेषांना हानी न पोचविण्याचे आवाहनही केले आहे. मोहिमेत समीर अराणके, राजेंद्र मोहिते, सौरभ कुंभार, गुरुनाथ साने, जयवंत मोहिते, प्रसाद ढवळीकर सहभागी झाले होते.

--------------------------

चौकट

‘निसर्ग जपू’चा संदेश

गडावर कचरा न करणे, ऐतिहासिक वास्तूंना धक्का न लावणे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवणे आणि जंगलातील जैवविविधतेचे संरक्षण करणे, ही प्रत्येक दुर्गप्रेमीची जबाबदारी आहे. अशा छोट्या कृतींतूनच गडकिल्ल्यांचे वैभव पुढील पिढ्यांपर्यंत जपता येईल, यासाठी ‘गड पाहू... निसर्ग जपू’ असा संदेशही यावेळी देण्यात आला.

------------------------
43763
महिमंडणगड (रत्नागिरी) ः किल्ले महिमंडणगडाची मोहीम कऱ्हाडच्या शिवमुद्रा ट्रेकर्सच्या दुर्गमित्रांनी पूर्ण केली. तेथे पोचल्यानंतर भैरी भवानी मंदिराची स्वच्छता करून जलाभिषेक केला.

------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

Prithviraj Chavan on PM Modi : देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

जमलं तर थोडीशी जमीन घ्या... स्वतःच्या जमिनीवर डाळ तांदूळ पिकवून खातेय लोकप्रिय अभिनेत्री; म्हणते- इतका फरक...

Marathi News Live Updates : राहुल गांधींचा पोलीस ठाण्यात ठिय्या; जंतर-मंतर आंदोलनातील जखमी विद्यार्थ्याच्या तक्रारीवर एफआयआरची मागणी

Shahada Bribery Case: वनपाल संजय पवार यांना न्यायालयीन कोठडी; सव्वादोन महिन्यांनंतर ‘एसीबी’ची दुसरी कारवाई

SCROLL FOR NEXT