पुणे

ढेबेवाडी यंदा तरी होईल का धरण गाळमुक्त

CD

यंदा तरी ‘महिंद’ होणार का गाळमुक्त?

धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा सवाल; २५ वर्षांपासून प्रयत्न फोल

ढेबेवाडी, ता. १८ : विभागातील महिंद धरण बांधून २५ वर्षे उलटली, तरी त्यात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ हटविण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. यंदा तरी पावसाळ्यापूर्वी हे धरण गाळमुक्त होणार, की तसाच पडून राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
येथून सुमारे दहा किलोमीटरवर महिंद धरण आहे. धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन २५ वर्षे झाले, तरीही पाटबंधारे विभागाला त्यातील गाळ काढण्याचे अद्याप नियोजन करता आलेले नाही. गाळामुळे धरणात नेमका पाणीसाठा किती? याचे नेमके उत्तर पाटबंधारे विभागाकडेच नाही. नैसर्गिक अनुकूलतेमुळे पावसाळ्याच्या सुरवातीच्या टप्प्यातच महिंद धरण ओव्हरफ्लो होते. ८५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या महिंद धरणाचे पाणलोट क्षेत्र ३५.९८ चौरस किलोमीटरचे आहे. बनपुरीपर्यंत लाभक्षेत्र असले, तरी त्यापुढीलही अनेक गावांना त्यातील पाण्याचा लाभ होतो. सध्याही महिंद धरण तुडुंब भरले आहे. उन्हाळ्यात पाणी पातळी कमी झाल्यावर या धरणात साचलेले गाळाचे ढिगारे दृष्टीला पडतात. पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात धरण ओव्हरफ्लो होणे, हा गाळाचाच परिणाम असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासनाकडून दरवर्षी या धरणातील गाळ काढण्याच्या घोषणा होतात. अनेकदा नियोजन करूनही गाळ निघालेला नाही, हीच वस्तुस्थिती आहे.
------------
चौकट
...................

अशी आहे वस्तुस्थिती...

* धरणात गाळ वाहून येण्याचे प्रमाण जास्त
* तब्बल २५ वर्षांपासून गाळ धरणात पडून
* पाणी कमी झाल्यावर दृष्टीला पडतात ढिगारे
* यंत्रणेचे गाळमुक्त धरणाचे प्रयत्न निष्फळ
* स्वखर्चाने गाळ वाहतूक शेतकऱ्यांसाठी अशक्यच
* शासनाने वाहतूक खर्च पेलण्याची आवश्यकता

B08000
महिंद : धरण तुडुंब भरल्याचे दिसत असले, तरी त्यात गाळाचे प्रमाण अधिक आहे.
-----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! दादर ते जेएनपीटी नवा मार्ग सुरू होणार; लोकलला मोठा दिलासा, पण कधीपासून?

IND vs NZ, 3rd ODI: डॅरिल मिशेल-ग्लेन फिलिप्सचा शतकी दणका! भारतासमोर 'करो वा मरो' सामन्यात न्यूझीलंडने ठेवलं मोठं लक्ष्य

अमिर खानच्या लेकासोबत साई पल्लवी स्क्रीन शेअर करणार, 'एक दिन' सिनेमाचा टीझरमधून वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेला महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, राजकीय हालचाली सुरू

AI Prank: ‘एआय’ इमेजचा विखारी प्रँक, बनावट अजगरामुळे टेन्शन वाढलं; मुंबईत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT