चाकण, ता. १९ : येथील ''महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड'' कंपनीत ५०० शिकाऊ उमेदवारांच्या (इंटर्नशिप) निवडीसाठी बुधवारी (ता. २०) थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना सहा ते नऊ महिने प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल. त्यांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन आणि कंपनीकडून अतिरिक्त मानधन दिले जाणार आहे. यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षणाअंती प्रमाणपत्रही मिळेल. या कॅम्पसाठी १८ ते २५ वयोगटातील किमान बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. इच्छुकांनी बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटोसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दृष्टिक्षेपात
▪ कॅम्प दिनांक : बुधवार, २० मे २०२६
▪ वेळ : सकाळी ८ वाजल्यापासून
▪ स्थळ : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, गेट क्र. २, चाकण, पुणे
▪ पात्रता : बारावी उत्तीर्ण (वय १८ ते २५)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.