पुणे

महूद जिल्हा परिषद गटात दादासाहेब लवटे विरुद्ध बाळासाहेब ढाळे यांच्यात जोरदार लढत

CD

लोगो : महूद जि. प. गट
---
MHD26B05024
उत्तम खांडेकर
---
MHD26B05025
बाळासाहेब ढाळे
---
MHD26B05026
दादासाहेब लवटे
---
----------
MHD26B05028
मनीषा येडगे
---
MHD26B05029
सोनाली पाटील
---
MHD26B05031
राकेश कदम
---
MHD26B05032
बाळासाहेब बंडगर
---
लवटे विरुद्ध ढाळे यांच्यात अटीतटीची लढत
माजी आमदार शहाजी पाटील यांचे होम ग्राउंड; पाच उमेदवार रिंगणात
सकाळ वृत्तसेवा
महूद, ता. ३ : माजी आमदार शहाजी पाटील यांचे होम ग्राउंड असलेल्या महूद जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे दादासाहेब लवटे आणि सांगोला तालुका विकास आघाडीचे बाळासाहेब ढाळे यांच्यात जोरदार लढत रंगली आहे. मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या गटात पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख लढत या दोन उमेदवारांतच होत असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेचे उमेदवार दादासाहेब लवटे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वर्षभर आधीपासून तयारी केल्याने प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले, उच्चशिक्षित तरुण म्हणून त्यांनी मतदारसंघात वेगळी ओळख निर्माण केली आहे. माजी आमदार शहाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुका शिवसेनाप्रमुख म्हणून काम करताना त्यांचा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील नेतृत्वाशी चांगला संपर्क निर्माण झाला आहे. उजनी उचल पाणी योजनेसाठी त्यांनी उभारलेल्या जनआंदोलनातून बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मंजूर झाली. शहाजी पाटील यांच्या आमदारकीच्या काळात या गटात रस्ते, पूल, बंधारे, व्यापारी संकुल अशी मोठी विकासकामे झाली असून, त्याच कामांच्या जोरावर लवटे मतदारांकडे जात आहेत.
सांगोला तालुका विकास आघाडीकडून माजी सरपंच बाळासाहेब ढाळे निवडणूक लढवत आहेत. महूदसारख्या मोठ्या गावाचे सरपंचपद भूषविल्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. कासाळगंगा उपनदीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी उभारलेली जनचळवळ आणि त्या कामासाठी महूद गावाला मिळालेले ‘नॅशनल वॉटर ॲवॉर्ड’ ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले ढाळे यांना पक्षाचे मजबूत संघटन, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी थेट संपर्क आणि सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव लाभला आहे. कोरोना काळात सरपंच म्हणून केलेल्या कामामुळेही त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम खांडेकर, वंचित बहुजन आघाडीचे गणेश गोडसे व अपक्ष स्वप्नील ढेरे हे इतर तीन उमेदवार आहेत.
---
पंचायत समिती गणांतही चुरशीच्या लढती
महूद पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून येथे शिवसेनेच्या सोनाली उमेश पाटील, सांगोला तालुका विकास आघाडीच्या मनीषा येडगे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दीपाली गाडे यांच्यात तिरंगी लढत आहे. पाटील कुटुंबीयांचा या भागातील सामाजिक व राजकीय सहभाग हा सोनाली पाटील यांचा मजबूत आधार आहे. तर चिकमहूद पंचायत समिती गण ‘नामाप्र’साठी राखीव असून, येथे शिवसेनेचे बाळासाहेब बंडगर, सांगोला तालुका विकास आघाडीचे राकेश कदम आणि शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बबन चव्हाण यांच्यात लढत होत आहे. चिकमहूद हे माजी आमदार शहाजी पाटील यांचे मूळ गाव असल्याने या गणातील निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकर मेट्रोच्या प्रतीक्षेतच! मेट्रो-४ लांबणीवर, तर मेट्रो-२बी, ९चा गारेगार प्रवास कधी सुरू होणार? MMRDAची महत्त्वाची माहिती

Solapur Murder: भावाच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीचा खून

Solapur Maharashtra Kesari: महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास मिळणार कार; २८, २९ मार्च रोजी सोलापूर येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT