पुणे

महूद मुख्य चौकातील बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई ; सुमारे अठरा हजार रुपयांचा दंड वसूल

CD

महूदच्या मुख्य चौकात बेशिस्त वाहनांवर कारवाई
एका दिवसात १८ हजार रुपयांचा दंड वसूल; कायमस्वरूपी उपाययोजना आवश्‍यक
सकाळ वृत्तसेवा
महूद, ता. ४ : सांगोला तालुक्यातील महूद येथील मुख्य चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण केले आहे. पंढरपूर- मल्हारपेठ या राज्य महामार्गाचे तर जत- पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. त्यातच येथील मुख्य चौकातील बेशिस्त वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे सांगोला पोलिसांच्या वाहतूक शाखेने शुक्रवारी (ता. २) महूद चौकात विशेष मोहीम राबवत अनेक बेशिस्त वाहनांवर कारवाई करून सुमारे १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
महूद हे सांगोला तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने येथे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढलेली असते. महूद मार्गे पंढरपूर- आटपाडी, अकलूज- पुणे तसेच लांब पल्ल्याच्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. त्यातच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी व मालवाहतूक वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. येथील मुख्य चौकात व रस्त्याच्या कडेला करण्यात येणारे चुकीचे पार्किंग यामुळेही वाहतूक कोंडी अधिकच गंभीर होत आहे. याचा फटका व्यापारी, शालेय विद्यार्थी व सामान्य नागरिकांना बसत असून, प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर महूद गावातील मुख्य चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी सांगोला पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबवली. यावेळी दुचाकी, चारचाकी तसेच बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वडाप वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली. या मोहिमे दरम्यान एकूण १६ केसेस दाखल करण्यात आल्या असून, १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक भारत वाघे, हेड कॉन्स्टेबल बजरंग बोराटे, नवनाथ माने, दीपक लेंगरे, पोलिस कॉन्स्टेबल अतुल खराडे, वाहतूक पोलिस अंमलदार सुनील मंडले यांनी केली. दरम्यान, महूदच्या मुख्य चौकातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी नियमित वाहतूक नियंत्रण, नो- पार्किंगची काटेकोर अंमलबजावणी व पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
---
कोट
महूद येथील मुख्य चौकामध्ये सतत होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे येथे एका वाहतूक पोलिसाची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना दिलासा मिळेल.
- भारत वाघे, सहायक पोलिस निरीक्षक, सांगोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT