पुणे

कार डोंगराला धडकून पलटी; एक ठार, तिघेजण जखमी

CD

GHR26A08536
संगमनेर ः माहुली घाट (ता.संगमनेर) येथे महामार्गालगत अपघातग्रस्त कार.

कार डोंगराला धडकून पलटी
एक ठार, तिघे जखमी


संगमनेर, ता. १८ ः पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात सोमवारी (ता.१८) सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या डोंगराला धडकून पलटी झाली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.
डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील विनोद दत्तात्रय चव्हाण (वय ५२, रा. पाषाण, पुणे), संभाजी दामोदर निम्हाणी (वय ५२), सुभाष किसन हगवणे (वय ५१) आणि गोपाल किसन नागरस (वय ६१) हे सोमवारी सकाळी नाशिकहून पुण्याकडे कारने जात होते. दरम्यान, माहुली घाटातील धोकादायक वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर जोरात आदळून पलटी झाली. या अपघातात विनोद दत्तात्रय चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले. जखमींवर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
.............
घाट रस्त्यावर वाहन चालविताना विशेष दक्षता घेऊन वेग मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विभागाने माहुली घाट आणि चंदनापुरी घाटात अपघात टाळण्यासाठी रम्बलर (छोटे गतिरोधक), इशारा फलक, परावर्तक चिन्हे आणि पथदिवे बसविणे गरजेचे आहे.
- रावसाहेब बांबळे, सहायक पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Chhatrapati Sambhajinagar Car Fire: जॅमर लावलेल्या कारला अचानक आग; छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरातील घटनेने खळबळ

झोपेतच घेतला अखेरचा श्वास! बॉलीवूड अभिनेत्रीचं २७ व्या वर्षी निधन, महिन्याभराने कुटुंबाने दिली माहिती

Marathi News Live Updates : कांदिवलीत चार मजली व्यावसायिक इमारतीला आग; ११ जणांची सुखरूप सुटका

१७ ऑगस्ट पंचांग! नागपंचमीसह श्रावणी सोमवार; जाणून घ्या शुभ-अशुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT