मका, सोयाबीन फोटो वापरणे
........
मका, सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा वाढता कल
जिल्ह्यात खरीपासाठी बियाणे मागणीत वाढ; यंदा साडेसात हजार क्विंटल अतिरिक्त मागणी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० ः जिल्ह्यात बदलत्या पीकपद्धतीचा प्रभाव यंदाच्या खरीप हंगामातील बियाणे मागणीत स्पष्टपणे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल सात हजार ४२२ क्विंटल अधिक बियाण्यांची मागणी कृषी विभागाने नोंदवली असून, त्यामागे मका व सोयाबीन क्षेत्रातील झपाट्याने झालेली वाढ हे प्रमुख कारण मानले जात आहे.
गतवर्षी खरीपातील प्रमुख पाच पिकांसाठी ६३ हजार ९१६ क्विंटल बियाण्यांचा वापर झाला होता. यंदा ही मागणी ७१ हजार क्विंटलांच्या पुढे गेली आहे. विशेषतः मक्याच्या बियाण्यांची मागणी तब्बल दुप्पट झाली आहे. गतवर्षी ३,७७० क्विंटल वापर झालेल्या मक्यासाठी यंदा ९ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवली गेली आहे. सोयाबीनसाठीही ४९ हजार क्विंटल बियाण्यांची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील पारंपरिक खरीप पिकांचे क्षेत्र घटले असून नगदी व कमी कालावधीतील पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. २०१४-१५ मध्ये ३८ हजार हेक्टरवर असलेले सोयाबीन क्षेत्र आता एक लाख ३५ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. मक्याचे क्षेत्र २,७२७ हेक्टरवरून तब्बल ८८ हजार हेक्टरवर गेले आहे. उडीद पिकाचे क्षेत्रही एक लाख सात हजार हेक्टरांवर पोहोचले आहे.
त्याउलट बाजरी, भुईमूग व सूर्यफूल या पारंपरिक पिकांचे क्षेत्र सातत्याने कमी होत आहे. २०१९-२० मध्ये जवळपास ५० हजार हेक्टरपर्यंत गेलेले बाजरीचे क्षेत्र आता २२ हजार हेक्टरांवर आले आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्च, बाजारभाव आणि प्रक्रिया उद्योगांची वाढती मागणी यामुळे शेतकरी पीकपद्धती बदलत असल्याचे चित्र आहे.
चौकट
खरीपासाठी बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)
- सोयाबीन : ४९,०००
- मका : ९,०००
- तूर : ७,१२५
- उडीद : ५,५१३
- बाजरी : ७००
दहा वर्षांत झपाट्याने वाढलेले क्षेत्र
- सोयाबीन : ३८ हजारांवरून १.३५ लाख हेक्टर
- मका : २,७२७ वरून ८८ हजार हेक्टर
- उडीद : १४ हजारांवरून १.०७ लाख हेक्टर
- तूर : ५१ हजारांवरून ८५ हजार हेक्टर
PNE26W20584
संकरित बियाणे दरवर्षी बदलावे लागते. खरीपासाठी सध्या बाजारात १० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. उर्वरित बियाणे मे अखेरपर्यंत उपलब्ध होतील.
शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.