MND26B00754
मैंदर्गी (ता. अक्कलकोट) :
---
मैंदर्गी न.प.च्या स्थायी, विषय समित्या बिनविरोध
विशेष सभेत सर्व समित्यांचे सभापती अन् सदस्य निश्चित
सकाळ वृत्तसेवा
मैंदर्गी, ता. २९ : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगर परिषदेच्या स्थायी समिती सभापती व विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्याची माहिती पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी अर्जुन सुरवसे यांनी दिली.
मैंदर्गी नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. नगर परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता असल्याने प्रत्येक समितीसाठी सभापती व सदस्य पदासाठी गट तयार करून नामनिर्देशन अर्ज सूचक व अनुमोदकांसह दाखल करण्यात आले. त्यामुळे सर्व समित्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी अर्जुन सुरवसे यांनी केली.
स्थायी समितीच्या सभापती म्हणून पदसिद्ध नगराध्यक्षा अंजली बाजारमठ या राहणार असून, उपनगराध्यक्ष सुरेश नागूर हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतील. स्थायी समिती सदस्य म्हणून शिवचलप्पा मुन्नोळी, तिप्पण्णा नागणसूर, कावेरी पुजारी, सुरेखा होळीकट्टी व मुतण्णा करजगी यांची निवड करण्यात आली आहे. एकूण चार समित्या करण्यात आल्या आहेत.
---
चौकट
विविध विषय समित्यांची निवड...
- सार्वजनिक बांधकाम समिती सभापती : शिवचलप्पा मुन्नोळी, सदस्य : अब्दुलगनी बाबुडे, चौडाबाई दुर्गी, भीमाशंकर पुजारी, शिवम्मा बमनळी.
- स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती : तिप्पण्णा नागणसूर, सदस्य : लाडलेसाहेब लुकडे, वीरेश भंगार्गी, सपना मोरे, शिवम्मा बमनळी.
- पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती सभापती : पदसिद्ध उपनगराध्यक्ष सुरेश नागूर, सदस्य : मेहराज लुकडे, वीरेश भंगार्गी, सपना मोरे, काशिनाथ जकापुरे.
- महिला व बालकल्याण व आरोग्य समिती सभापती : कावेरी पुजारी, सदस्य : रोहिणी निंबाळ, रेश्मा उस्ताद, भौरम्मा गुंडद, मेहराज लुकडे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.