major disaster was averted Ashadhi wari 2 warkari who drowned canal were saved wari palkhi sohala pandharpur culture
major disaster was averted Ashadhi wari 2 warkari who drowned canal were saved wari palkhi sohala pandharpur culture  sakal
पुणे

Ashadi Wari 2023 : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मोठा अनर्थ टळला; कॅनॉलमध्ये बुडणाऱ्या २ वारकऱ्यांचे प्राण वाचले

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : जनता वसाहतीतील कॅनॉलमध्ये पाण्यात बुडत असलेल्या एका मुलासह दोघा वारकऱ्यांचे प्राण अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोमवारी रात्री शहरात आगमन झाले. या पालख्यांसोबत राज्यभरातून लाखो वारकरी शहरात दाखल झाले आहेत. बीड जिल्ह्यातून आलेला वारकरी औदुंबर कदम (वय १५) हा अंघोळ करण्यासाठी जनता वसाहत येथील कॅनॉलमध्ये उतरला.

कॅनॉलच्या कडेला पायऱ्यावर थांबून अंघोळ करीत होता. त्यावेळी अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याने घाबरून बचावासाठी आरडाओरडा केला. त्यावेळी नीलेश जाधव (वय ३५) यांनी पाण्यात उडी मारून त्याला वाचविले. परंतु मुलाने घाबरून त्यांना घट्ट मिठी मारली. तसेच, पाण्याचा प्रवाहही जोरात होता.

त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत दोघेही वाहून जात होते. ही बाब कॅनॉलजवळ असलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलास कळवली. त्यानंतर जनता वसाहत अग्निशमन केंद्रातील जवान नीलेश माने, सचिन आवाळे आणि वाहनचालक ऋषी बिबवे हे तातडीने घटनास्थळी पोचले. या जवानांनी दोरी आणि लाइफ रिंगचा वापर करत दोघा वारकऱ्यांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. औदुंबर हा बीड जिल्ह्यातील असून, तो आषाढी वारीनिमित्त आल्याचे दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT