Encroachment Crime Sakal
पुणे

येरवडा, नगर रस्ता भागात मोठी अतिक्रमण कारवाई; चौदा ट्रक माल जप्त

येरवडा आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आज रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांवर मोठी कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी - येरवडा (Yerwada) आणि नगर रस्ता (Nagar Road) क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आज रस्त्यावर अतिक्रमण (Encroachment) केलेल्या विक्रेत्यांवर मोठी कारवाई (Crime) करण्यात आली. येरवड्यातील पर्णकुटी येथून सुरू झालेली ही कारवाई खराडी येथील पुणे महानगरपालिकेच्या हद्दीपर्यंत करण्यात आली. कारवाई मध्ये तब्बल चौदा ट्रक माल जप्त करण्यात आला.

पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जगताप, पालिकेच्या आतिक्रमण विभागाचे विभागीय अधिकारी सुहास ढोकले, विभागीय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता यांच्या नियंत्रणाखाली पोलीस, सात ट्रक आणि चाळीस बिगाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

येरवडा येथील पर्णकुटी पोलिस चौकी ते गुंजन टॉकीज पासून ते नगर रोड मनपा हद्द आणि चंदननगर ते मुंढवा मनपा हद्द, विमाननगर परिसर व विमानतळ रस्ता या भागात ती कारवाई दिवसभर सुरू होती.

पदपथावर अतिक्रमण केलेल्या भाजी गाड्या, कपडे व चपलाची दुकाने, फळांची दुकाने, चहाचे हातगाड्या नीराच्या टपऱ्या, वडापावची दुकाने, दुकानांसमोर पार्किंगच्या जागेत अतिक्रमण करून व्यवसायिकांनी ठेवलेले साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आले.

याविषयी माहिती देताना विभागीय अधिकारी सुहास ढोकले म्हणाले, आजच्या कारवाईत अनेक पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले. यापुढेही अतिक्रमण कारवाई नियमित सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT