pune fire accident Esakal
पुणे

Fire Accident in Pune: पुण्यातील साळुंके विहार परिसरात गॅस पाईपलाईनला लागली आग, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Fire Accident at Salunke vihar: आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्मिशामक दल घटनास्थळी पोहोचले

सकाळ डिजिटल टीम

Major Fire break in Pune:शनिवारी (दि. १५ जुलै)पुण्यातील सांळुके विहार परिसरात मोठी आग लागली. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड (एमएनजीएल)च्या गॅस पाईपलाईनला नाला पार्क जवळील साळुंके विहार येथे भीषण लागली.

आग अत्यंत वेगाने पसरल्याने परिसरातील नागरिक आणि येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आग लागल्याचे समजताच एमजीएनलची एक तुकडी आणि अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्मिशामक दलाच्या पाच गाड्या आणि २ पाण्याचे टॅंकर आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. (Latest marathi News )

अग्निशामक दलाला या घटनेची माहिती १२च्या सुमारास मिळाली, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गॅस पाईपलाईनला लागलेल्या आगीची दाहकता इतकी होती की त्या परिसरातील गाड्या आगीमुळे गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. याआगीमुळे आजुबाजूच्या परिसरात धोका निर्माण झाला होता, त्यामुळे अग्मिशामक दल तत्परतेने घटनास्थळी दाखल झालं. मात्र, आग अद्याप नियंत्रणात येऊ शकली नाही. (Latest marathi News )

या परिसरात आग लागल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला असून, खबरदारी म्हणून सांळुके विहार परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT