Sakal-Vidya 
पुणे

वित्तीय क्षेत्रात आता करा करिअर; रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध

सकाळवृत्तसेवा

पुणे - वित्तीय क्षेत्रात रोजगाराच्या आज अनेक संधी उपलब्ध आहेत. पण याची कल्पना अनेकांना नसते. त्यामुळे केवळ नोकरीच्या मागे न धावता वित्तीय उद्योजकतेचा कानमंत्र देण्याची आज गरज आहे. नेमकी हीच गरज ओळखून  ‘सकाळ’ विद्या आणि `एसपी फायनान्स ॲकॅडमी ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (ता. १३) एका खास सेमिनारचे आयोजन केले जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सेमिनारच्या रुपाने तरूण-तरूणी, गृहिणी, मध्यमवयीन नागरिक अशा सर्व वयोगटातील मंडळींना हमखास उत्पन्नाची सुवर्णसंधी प्राप्त होऊ शकते. गेली १२ वर्षे वित्तीय क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या एसपी एंटरप्राययझेसने ‘एसपी फायनान्स ॲकॅडमी आॅफ इंडिया’ची स्थापना केली आहे.

‘लर्न, अर्न अँड बी युअर बॉस’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून तिचे काम चालते. यामागची प्रेरणा आहे ती एसपी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन बामगुडे यांची. शून्यातून विश्व उभे करणाऱ्या सचिन बामगुडे यांनी स्वतःच्याच रूपाने वित्तीय उद्योजकतेचा आदर्श उभा केला आहे. या सेमिनारमध्ये स्वतः सचिन बामगुडे यांच्या बरोबरच, उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे प्रसिद्ध प्रशिक्षक आणि वक्ते T. I. G. E. R. संतोष नायर मार्गदर्शन करणार आहेत. देशा-परदेशातील अनेक कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या प्रेरणादायी शैलीने यशाचा मार्ग दाखविणारे संतोष नायर यांचे भाषण अनेकांचे आयुष्य बदलून टाकू शकते. त्यामुळे तमाम उत्साही नागरिकांसाठी ही चुकवू नये अशी संधी असेल. सध्याच्या बिकट परिस्थितीत आर्थिक उत्पन्नाचा मार्ग शोधण्याचा खास मंत्र येथे मिळणार आहे.

येत्या रविवारी सायंकाळी ५ वाजता हे सेमिनार गणेश कला-क्रीडा मंच येथे आयोजित केले जाणार असून, त्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर, मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि ‘सोशल डिस्टंन्सिंग’ पाळून या सेमिनारचे आयोजन केले जाणार आहे. जागा मर्यादित असल्याने ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य’ दिले जाणार आहे.

  • कोठे ?- गणेश कला-क्रीडा मंच, नेहरू स्टेडियमजवळ, स्वारगेट
  • कधी?- रविवार, ता. १३ डिसेंबर २०२०
  • वेळ - सायंकाळी ५ वाजता
  • मार्गदर्शक - सचिन बामगुडे आणि T. I. G. E. R. संतोष नायर
  • मर्यादित विनामूल्य प्रवेश, नावनोंदणी आवश्यक

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐकावं ते नवलच! चक्क सरबतावर लावला 'गॅस क्रायसिस चार्ज', लिंबू गरम करून वापरला का? युजर्सचा सवाल

अबरार अहमदला करारबद्ध करणाऱ्या काव्या मारनच्या SRH ला सुनील गावस्करांनी सुनावले; म्हणाले, या पैशातून ते आपले जवान मारतात...

Crime: पत्नीवर नको तो संशय, व्यावसायिक पती संतापला, रागाच्या भरात धक्कादायक कृत्य; मुंबईत खळबळ

Latest Marathi Update : पवना नदीत पोहायला गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

Numerology Predictions : १६ मार्चपासून मूलांक १ ते ९ साठी पैसाच पैसा; पण करिअर अन् आरोग्य कसं असेल? पाहा तुमच्या भाग्यात काय लिहिलय

SCROLL FOR NEXT