Stone crusher blasting and dust pollution have allegedly damaged farmland and fruit trees in Malathane, Shirur taluka.

 

esakal

पुणे

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

Malathane Stone Crusher, Blasting Damage, Fruit Trees : मलठण येथील स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंग व धुळीमुळे शेतजमिनी, हजारो फळझाडे आणि कंपाउंडचे नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कवठे येमाई, : मलठण (ता. शिरूर) येथे स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे तसेच उडणाऱ्या धुळीमुळे नजीकच्या शेतजमिनी, हजारो फळझाडे आणि काही ठिकाणच्या कंपाउंडचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी स्टोनक्रशर व्यावसायिकांवर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी खासगी बांधकाम व्यावसायिक विलास थानमल पालरेषा यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलिस प्रशासनाकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.

मलठण परिसरातील स्टोनक्रशर व खाणपट्टयाच्या कामांमुळे ध्वनी व वायुप्रदूषणाचा धोका निर्माण झाला असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणावर परिणाम होत असल्याचे पालरेषा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रारी करून लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अपेक्षित दखल न घेतल्याने स्मरणपत्र देत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पालरेषा यांची मलठण परिसरात जमीन असून तेथे गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तर काही भागात ते शेती करतात. त्यांच्या जमिनीलगत असलेल्या भाऊसाहेब पाचंगे यांच्या भाग्यलक्ष्मी स्टोन क्रशरमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे जमिनीचे संरक्षण कुंपण कोसळले असून जमीन खचली आहे. क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे आंबा, पेरू, चिकू, जांभूळ यांसह हजारो फळझाडांचे नुकसान झाले असून, अनेक झाडे जळून खाक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. ब्लास्टिंग करताना सुरक्षित अंतर राखले जात नसल्याने नजीकच्या जमिनीला भेगा पडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

खाणपट्टयाला परवानगी देताना पर्यावरणपूरक वृक्षलागवड तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या अटी असतात. मात्र, संबंधित ठिकाणी आवश्यक वृक्षलागवड व सुरक्षिततेच्या उपाययोजना झालेल्या दिसत नसून नियमांचे उल्लंघन करून उत्खनन होत असून पाण्याचा पुरेसा वापर केला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उधळत आहे. तसेच वाहतूक करत असताना आवश्यक काळजी घेतली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळीचे लोट उधळत असल्याचे पालरेषा यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित परवानग्या, पर्यावरणीय अटी आणि त्यांचे पालन यांची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दोन वर्षांपासून तक्रारींचा पाढा; प्रशासन मात्र ‘कागदी घोडे’ नाचविण्यात व्यस्त!

मलठण परिसरातील स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंग व धुळीमुळे शेतातील पिकांचे आणि हजारो फळझाडांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी बांधकाम व्यावसायिक विलास पालरेषा यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिस प्रशासनाकडे गेल्या दोन वर्षांपासून वारंवार केल्या आहेत. मात्र, तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. तक्रारींची दखल न घेतल्याने नुकसानाचा आकडा वाढत असतानाही कारवाई करण्यासाठी प्रशासन नेमकी कोणाची वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT