पुणे

बारामतीतील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची शासनाकडून घोषणा

मिलिंद संगई

बारामती : तालुक्याली माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याची शासकीय उदघोषणा आज अधिकृतपणे झाली. शासनाचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्य शासनाच्या असाधारण राजपत्रात ही उद्घोषणा प्रसिध्द करण्याबाबतचे आदेश आज दिले आहेत. 

या संदर्भात आक्षेप घ्यायचे असतील तर तीस दिवसात सदरचे लेखी आक्षेप जिल्हाधिका-यांकडे सादर करायचे आहेत. जिल्हाधिकारी आक्षेपांचे स्वरुप पाहून त्यावर निर्णय घेणार आहेत. 

माळेगाव बुद्रुक येथील सिटी सर्व्हे क्रमांक 1 ते 3015, माळेगाव बुद्रुक या महसूली गावातील सर्व गट क्रमांक 1 ते 708, तसेच येळेवस्ती महसूली गावातील 1 ते 246 गट यात समाविष्ट होणार आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान उत्तरेस माळेगाव खुर्द, उत्तर पूर्वेस कसबा, बारामती, पूर्वेस मळद व पाहुणेवाडी, दक्षिण पूर्वेस पाहुणेवाडी, दक्षिणेस शिरवली व खांडज, दक्षिण पश्चिमेस धुमाळवाडी, पश्चिमेस पणदरे व पश्चिम उत्तरेस सोनकसवाडी असा या नगरपंचायतीच्या हद्दीचा तपशिलही यात नमूद करण्यात आला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून या गावातील ग्रामस्थांची नगरपंचायतीची मागणी होती, ती या निमित्ताने आता पूर्णत्वास गेली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

SCROLL FOR NEXT