baramati news  e sakal
पुणे

Baramati : माळेगाव नगरपंचायत जिंका,पाच कोटीचा विकास निधी देतो : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे आश्वासन

अन् त्याच दिवशी राज्याच्या तिजोरीतून पाच कोटींचा विकास निधी माळेगावला दिला जाणार

सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : बारामतील माळेगाव नगरपंचायतीला राजकिय दृष्ट्या विशेष महत्व आहे. त्यामुळे ही नगर पंचायत भाजपच्या झेंड्याखाली आणायची आहे. त्या दृष्टीने येथील नेतेमंडळींसह कार्य़कर्त्यांनी आत्तापासून कामाला लागले पाहिजे. ज्या दिवशी ही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात येईल, त्याच दिवशी राज्याच्या तिजोरीतून पाच कोटींचा विकास निधी माळेगावला दिला जाईल, असे आश्वासन देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी माळेगावची निवडणूक पुर्ण क्षमतेने लढविणार असल्याचे जाहिर केले.

माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) नगरपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूकीचा कार्य़क्रम पुढील काही दिवसात निवडणूक आयोग जाहिर करण्याची दाट शक्यता आहे. तसेच लोकसंस्थेच्या दृष्टीने माळेगाव तालुक्यात मोठे गाव आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक, विधानसभा तयारीच्या पार्श्वभूमिवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार (ता. ६) रोजी रात्रीच्यावेळी माळेगावात बुथ कमिटीतील कार्य़कर्त्यांची विशेष बैठक घेतली होती. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, आमदार राहुल कुल, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोठे, भाजपचे नेते बाळासाहेब गावडे, ज्येष्ठ नेते चंद्रऱाव तावरे, पृथ्वीराज जाचक, जिल्हाध्यक्ष गणेश भोगडे, दिलीप खैरै आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान,नेते बावनकुळे म्हणाले, देशात पंतप्रधान मोदीसाहेबांचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे. त्यात आता महराष्ट्रात भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविणे खूपच सोपे झाले आहे. भाजपच्या वरीष्ठ नेतृत्वांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या लोकहिताच्या योजना गावोगावी पोचविण्यासाठी प्रत्येक कार्य़कर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. लोकांचा पाटींबा भाजपला आहेच, त्यात वाढ करून यापुढील काळातील लोकसभा निवडणूक असो, अथवा माळेगावसारख्या नगरपंचायती, महानगरपालिकांच्या निवडणूका जिंकायच्या आहेत.तत्पुर्वी रंजन तावरे म्हणाले, पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार लोकसभा, विधानसभा असो अथवा माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीत कमळ फुलविण्यासाठी कार्य़कर्त्यांनी प्रमाणिकपणे कृतीआराखडा आमंलात आणला पाहिजे. अर्थात या कामात ज्येष्ठ नेतेमंडळीही मागे राहणार नाहीत.`` यावेळी माजी सरपंच जयदीप तावरे,अशोकराव सस्ते, धैर्य़शिल तावरे, शशिकांत तावरे,अनिल लोणकर,युवराज तावरे,अजित तांबोळी,युसूफ शेख आदी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षवाढीच्या दृष्टीने वरिष्ठांसमोर सूचना मांडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT