पुणे

शिर्डी ः- जनसंघला पहिला जिल्हाध्यक्ष, भाजपला पहिला खासदार अन अटलजींच्या पोस्टमनचे वास्तव्य असलेले मळेगावथडीची संघर्षमय कहाणी....

CD

SHD26B05507
कोपरगाव ः मळेगावथडी येथील भेटीचे छायाचित्र.

सकाळ विशेष
-------

मळेगावथडीने दिला भाजपला पहिला खासदार
कृष्णराव बडदे जिल्हाध्यक्ष अन् अटलजींच्या पोस्टमन

सतीश वैजापूरकर ः सकाळ वृत्तसेवा
शिर्डी, ता. २६ ः कोपरगाव तालुक्यातील मळेगावथडी या जेमतेम अडीच हजार लोकसंख्येच्या गावात एकेकाळी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक डाव मांडला. त्याची कीर्ती दिल्लीपर्यंत धडकली. अटलजींचे पोस्टमन येथे रहायचे. जनसंघाला पहिला जिल्हाध्यक्ष, तर भाजपला या मतदारसंघातील पहिला खासदार या गावानेच दिला. हा डाव मांडण्यात पुढाकार घेणारे कृष्णराव बडदे आणि त्यांच्या कुटुंबाला आणीबाणीत त्याची मोठी किंमत मोजावी लागली.
जनसंघ, भाजप, आणीबाणी आणि मळेगावथडीचे हे असे काही वेगळे नाते आहे. ही शोकांतिका आहे की, कार्यकर्त्यांचा विचारसरणीसाठी संघर्ष हे ज्याचे त्याने ठरवावे, अशी ही आगळीवेगळी कहाणी.
या गावातील बागायतदार कृष्णराव बडदे यांनी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाचे रोपटे लावले. जिल्हाभर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असताना ग्रामपंचायत जनसंघाकडे. तेही सलग पंधरा वर्षे सरपंच होते. येथील सहकारी सेवा संस्थेला संघशक्ती असे नाव. ही संस्था शेतकऱ्यांना कर्ज देण्याबरोबर किराणा आणि कापड दुकान सहकारी तत्त्वावर चालवायची. बडदे यांचे बंधू शंकरराव, उत्तमराव आणि ॲड. भीमराव सर्व जण जिल्ह्यातील जनसंघाचे आधारस्तंभ.
एकदा अटलजी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोपरगाव रेल्वेस्थानकावर उतरले. कृष्णराव आणि रामभाऊ चंद्रे बऱ्याच कार्यकर्त्यांसह सायलकवर स्वागताला हजर. अटलजी टांग्यातून कोपरगावात येणार होते. ऐनवेळी बेत बदलला अन् ते रामभाऊंच्या सायकलवर डबलसीट बसले. अटलजींची सायकल सवारी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली.
पुढे १९७२ साली जनसंघाला कोपरगाव विधानसभेची निवडणूक लढवायची, उमेदवार मिळेना. कृष्णराव हे रामभाऊंना घेऊन मुंबई भेटीवर असलेल्या अटलजींकडे गेले. त्यांनी रामभाऊंना उमेदवारी करण्याची गळ घातली. त्यावर रामभाऊ म्हणाले, जनसंघाचे तेथे फारसे काही नाही. त्यावर अटलजी म्हणाले, रामभाऊ तुम्ही जनसंघाचे आणि माझे पोस्टमन आहात. आपल्याला जिंकायचे नाही, फक्त जनसंघाचा दिवा घरोघरी पोहोच करायचा. अटलींचे पोस्टमन म्हणून रामभाऊ उभे राहिले आणि निवडणुकीत अवघ्या दोन टक्के मतदारांपर्यंत जनसंघाचा दिवा पोहोचला.
--------------
SHD26B05506
कृष्णराव बडदे इतिहासाच्या केंद्रस्थानी
पुढे २५ जून १९७५ला आणीबाणी आली. कृष्णराव, उत्तमराव आणि ॲड. भीमराव या तीनही बंधूंना अटक झाली. एकोणावीस महिन्यांच्या या अटकेने त्यांच्या बागायत शेतीचा आणि गावात मांडलेल्या जनसंघाचा डाव पुरता मोडला. पुढे काळाच्या ओघात जनसंघाचे रुपांतर भाजपत झाले. भाजप बाळसे धरू लागला. कुणाच्या ध्यानीमनी नसताना ॲड. भीमराव बडदे खासदार झाले. अटलजींचे पोस्टमन, जनसंघाचे पहिले जिल्हाध्यक्ष आणि भाजपला पहिला खासदार देणारे गाव, अशी मळेगावथडीची ओळख कायम राहिली. स्व. कृष्णराव बडदे या संघर्षमय इतिहासाच्या केंद्रस्थानी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT