Sopankaka Palkhi sakal
पुणे

Sopankaka Palkhi : ...अखेर सोपानकाकांची पालखी बारामती शहरात सुखरूप पोचली

बारामती- माळेगाव राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचा सोपानकाका पालखी सोहळ्याला व नियमित वाहतूकीला अडथळा येऊ नये, या उद्देशाने बांधकाम विभागाने घेतलेली खबरदारी आज खूपच उपयोगी ठरली.

सकाळ वृत्तसेवा

माळेगाव - बारामती- माळेगाव राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचा सोपानकाका पालखी सोहळ्याला व नियमित वाहतूकीला अडथळा येऊ नये, या उद्देशाने बांधकाम विभागाने घेतलेली खबरदारी आज खूपच उपयोगी ठरली.

विशेषतः शारदानगर येथे तर १० मिटर रुंदीच्या रस्त्याचे काम अर्धवट असतानाही तो रस्ता वाहतूकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाने कार्य़रत केला. परिणामी आज (बुधवारी ) पालखीमार्गावरील वाहतूकीचा वाढता ताण कमी होण्यास मदत झाली.

त्यामुळे माळेगाव बुद्रूक येथील मुक्काम आटोपून सोपानकाका महाराजांची पालखी बारामती शहरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुखरूपपणे पोचली.

रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम विभागाबरोबरच खत्री कंट्रक्शन कंपनी, आदित्य कंट्रक्शन, डी.पी.जगताप कंन्ट्रक्शन कंपनीचे घेतलेले परिश्रम निश्चितच कौतूकास्पद ठरले, असे मत  अनेक प्रवाशांसह ट्राफिक पोलिसांनी बोलून दाखविले. हे विशेष होय.

बारामती- माळेगाव बुद्रूक हद्दीमधील राज्यमार्गाचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरणाचे काम सध्याला सुरू आहे. अर्थात रुंदीकरणाच्या कामामुळे जगद्गुरू संत सोपानकाका महाराजांच्या पालखी माळेगावचा मुक्काम संपवून बुधवारी (ता.२१) रोजी बारामतीमध्ये सुखरूपणे पोचविणे प्रशासनापुढे काहीसे अडचणिचे होते.

या समस्येचा विचार करून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी याआगोदरच संबंधित प्रशासनाला उपायोजना करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील यांनीही संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बारामती-माळेगाव राज्यमार्गावरील रुंदीकरणाच्या कामाची शनिवार (ता. १९) रोजी पाहणी केली होती.

त्यामध्ये रस्त्यावरील नियमित वाहतूक आणि पालखीमधील पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची संख्या, तसेच त्यांची वाहणे विचारात घेता शारदानगर येथे धोकादायक स्थिती त्यांना आढळून आली होती. त्या समस्यांवर तातडीने उपायोजना करण्यासंबंधी हनुमंत पाटील यांनी बांधकाम विभागाला सूचना केल्या होत्या.

तसेच त्यांनी संबंधित रस्त्याचे रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनाही प्राप्त परिस्थितीचे गार्भिय समजून सांगितले. त्यामुळे वेळीच संबंधित यंत्रणा हालली आणि शारदानगर येथील रुंदीकरणामधील १० मिटर रुंदीचा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात कार्य़ान्वित केला.

या उपायोजनांमुळे आज बुधवारी माळेगावचा मुक्कांम संपवून सोपानकाकांची पालखी बारामती शहरात सुखरूपणे पोचविण्यात प्रशासनाला यश आले.

रस्ता सुरक्षिततेच्या या प्रक्रियेत प्रांताधिकारी वैभव नावडेकर, बांधाकम विभागाचे उपविभागिय अभियंता सुभाष पाटील, खत्री कंट्रक्शन कंपनी, आदित्य कंट्रक्शन, डी.पी.जगताप कंन्ट्रक्शन कंपनीने चांगले परिश्रम घेतल्याचे दिसून आले.

दुसरीकडे, माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलिस निरिक्षक साळवे यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनीही पालखी बंदोबस्त चोख ठेवल्याने माळेगावात मुक्कामाच्या ठिकाणी अथवा रस्त्याने कोणताही अनुचिक प्रकार घडला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

IPL 2026: Umpire चा दुजाभाव? मुंबई अन् दिल्लीला वेगवेगळा नियम? हार्दिकच्या ग्लव्ह्ज बदलीमुळे होतायेत आरोप

पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT