MLG26B03187
माळीनगर (ता. माळशिरस) : रोटरी क्लबतर्फे माळीनगर शिक्षण संस्थेस ई-लर्निंग स्मार्ट टीव्ही भेटप्रसंगी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातूरे, संस्थेचे सचिव अजय गिरमे, केतन बोरावके, अजिंक्य जाधव व इतर.
माळीनगर शिक्षण संस्थेस स्मार्ट टीव्ही भेट
माळीनगर : रोटरी क्लब ऑफ अकलूज यांच्यामार्फत येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीस चार ई-लर्निंग स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. संस्थेच्या चार शाळांसाठी हा टीव्ही वापरण्यात येणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व डिजिटल शिक्षणाची संधी मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा सोहळा रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातूरे यांच्या हस्ते पार पडला. संस्थाध्यक्ष राजेंद्र गिरमे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव अजय गिरमे, रोटरीचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख कल्पेश पांढरे, नवनाथ नागणे, नितीन कुदळे, गोमटेश दोशी, दीपक फडे, ओजस दोभाडा, अभिषेक टेके, अजित वीर उपस्थित होते. या ई-लर्निंग स्मार्ट टीव्ही प्रणालीचा लाभ संस्थेतील ३५०० विद्यार्थ्यांना होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.