पुणे

मलकापूर नगरपरिषदेमार्फत शहरात स्वच्छता मोहिम

CD

मलकापूरला लोकसहभागातून स्वच्छता मोहीम

मलकापूर, ता. २४ : येथील पालिकेने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आरोग्य विभागाच्या पुढाकाराने सदस्य, कर्मचाऱ्यांनी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवली.

या मोहिमेला मलकापूर फाट्यापासून सुरू झाली. त्यानंतर यशवंत हाउसिंग सोसायटी, शिवाजीनगर परिसर, अहिल्यानगर, औदुंबर कॉलनी, शिवाजीनगर ते लक्ष्मीनगर मुख्य रस्ता आणि लक्ष्मीदेवी मंदिर परिसरात स्वच्छता केली. स्वच्छता मोहिमेनंतर संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दर १५ दिवसांनी प्रभागनिहाय लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्याचा मानस नगराध्यक्ष तेजस सोनावले यांनी व्यक्त केला. या स्वच्छता मोहिमेसोबतच प्लॅस्टिक बंदीसाठी मोहीम लवकरच सुरू करू, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले.

यावेळी मुख्याधिकारी कपिल जगताप, नियोजन सभापती सूरज शेवाळे, नगरसेविका राजश्री जगताप, नगरसेवक भीमाशंकर माऊर, सुनील खैरे, शरद पवार, प्रमोद शिंदे, नितीन काशीद, शहाजी पाटील, नितीन जगताप, अशोक पाचुंदकर, नंदकुमार साठे, अभिजित शिंदे यांच्यासह विभागप्रमुख, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
.....

A01334,
मलकापूर : स्वच्छता मोहिमेत सहभागी पदाधिकारी, अधिकारी व नागरिक.
.......................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : यवतमाळात महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी; विकृत तरुणाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT