पर्यावरणपूरक गौरी-गणपती सजावट स्पर्धा
मलकापूर पालिकेतर्फे आयोजन; नावनोंदणीचे आवाहन
मलकापूर, ता. १३ : येथील पालिकेतर्फे महिला व बालकल्याण समिती, माझी वसुंधरा अभियान ७.० व स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत पर्यावरणपूरक घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रवेश विनामूल्य असून, स्पर्धेसाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
सजावट ही पर्यावरणपूरक सामाजिक सृजनशीलतेवर व कल्पकतेवर आधारित असावी, आकर्षक सजावट व देखाव्यासाठी उपलब्ध जागेचा सुयोग्य वापर करावा, निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असे स्पर्धेचे निकष असतील. सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू आणि प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.
नावनोंदणीसाठी महिला बालकल्याण सभापती गीतांजली पाटील, उपसभापती गीता साठे, नगरसेविका राजश्री जगताप, डॉ. स्वाती थोरात, मृणाली इंगवले, शीतल किल्लेदार, विनया कांदळकर, वैशाली लेखे, शाहीर मणेर व प्रत्येक प्रभागातील महिला नगरसेविकांकडे करावी.
स्पर्धा मलकापूरसाठी असून, शहरातील कुटुंबापूर्तीच मर्यादित राहील. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहणार आहे. स्पर्धा विनामूल्य आहे. स्पर्धकाचे नावनोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर असावी. सजावटीचा दोन मिनिटांचा व्हिडिओ तसेच सजावटीची दोन छायाचित्रे Malkapur2008@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. परीक्षकाद्वारे १८ व १९ सप्टेंबरला सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत परीक्षण केले जाईल, स्पर्धकांची नावनोंदणी १५ सप्टेंबरपर्यंत करावी, शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्व व पश्चिम भागातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण दहा बक्षीस वितरित केली जाणार आहेत.
................
अशी आहेत बक्षिसे
प्रथम क्रमांक : इनफ्रेड कुक-टॉप
द्वितीय क्रमांक : ऑटोमॅटिक कुकर वॉर्मर
तृतीय क्रमांक : ब्लेंडर मिक्सर
उत्तेजनार्थ (दोन बक्षिसे) : इस्त्री
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.