पुणे

मलकापूर धनंजय येडगे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची संवाद

CD

झेडपी शाळा पालिकेकडे वर्ग करण्यास वेग

मलकापूरला शिक्षण सभापती येडगेंनी साधला शिक्षकांशी संवाद

मलकापूर, ता. २७ : शहरातील जिल्हा परिषदेच्या ११ शाळांना आवश्यक निधी उपलब्ध करून त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता उंचावण्यासाठी या शाळा जिल्हा परिषदेकडून पालिकेकडे वर्ग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य व शिक्षण सभापती धनंजय येडगे यांनी संबंधित शाळांची पाहणी करून शिक्षकांशी संवाद साधला.

पाहणीदरम्यान शिक्षकांनी शाळांत भेडसावणाऱ्या विविध अडचणी सभापतींसमोर मांडल्या. इमारतींची दुरुस्ती, स्वच्छतागृहांची कमतरता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, डिजिटल साधनांची गरज तसेच शैक्षणिक साहित्याचा अभाव अशा अनेक मूलभूत समस्या असल्याचे निदर्शनास आले. सभापती येडगे यांनी प्रत्येक शाळेतील समस्यांची स्वतंत्र नोंद करून घेत त्यावर ठोस उपाययोजना कशा करता येतील, याबाबत शिक्षकांशी चर्चा केली.
यासंदर्भात लवकरच सविस्तर प्रस्ताव तयार करून आमदार डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्ष तेजस सोनवले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्याकडे तो देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभापती येडगे म्हणाले, ‘‘सध्या या शाळा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित असल्याने नगरपरिषदेकडून थेट निधी देताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात. मात्र, या शाळा नगरपरिषदेकडे वर्ग करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत आमदार डॉ. भोसले यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि आमदार निधीतून शाळांच्या मूलभूत गरजांसाठी निधी उपलब्ध करून देता येतो का? यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’
या उपक्रमाला नगराध्यक्ष सोनवले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक, शिक्षकांचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच शाळांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
.....
A01337
मलकापूर : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची संवाद साधताना धनंजय येडगे.
................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिग्गज अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा ठरला फ्लॉप, आता OTT वर ट्रेंडिंगमध्ये, चित्रपट पाहून डोळ्यात येईल पाणी

Nano Banana 2 झाले लाँच! फ्रीमध्ये तुमच्या फोटोला द्या नवा ट्रेंडी लुक, गुगल जेमिनीवर कॉपी-पेस्ट करा 'हे' 5 बेस्ट प्रॉम्प्ट

Latest Marathi News Live Update : अजित पवार यांच्या अपघाताप्रकणी आज DGCA चा रिपोर्ट येण्याची शक्यता

झिम्बाब्वेचा विराट कोहली! भारताविरुद्ध ९७ धावांची खेळी करणारा ब्रायन बेनेट नेमका कोण?

Block Layoffs : AI ने हिरावला तोंडचा घास ! दिग्गज अमेरिकन कंपनीने ४००० हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT