MLS26B02950
माळशिरस ः येथे विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन करताना माजी आमदार राम सातपुते व अन्य मान्यवर.
माळशिरसचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाजप कटिबद्ध : राम सातपुते
ज्येष्ठांसाठी ५० लाखांच्या विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन
माळशिरस, ता. १० ः माळशिरस नगरपंचायत भाजपच्या विचारांची असून, शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे माळशिरस शहराकडे विशेष लक्ष असून, त्यांच्या माध्यमातून शहर विकासाच्या दिशेने पाऊल टाकत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राम सातपुते यांनी केले.
माळशिरस शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० लाख रुपये खर्चाच्या विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. अप्पासाहेब देशमुख, ॲड. पी. ई. कुलकर्णी, डॉ. सुभाष देशमाने, एम. डी. सिद, नगरसेवक शिवाजीराव देशमुख, कैलास वामन, डॉ. शिंगाडे, रणजित ओहोळ, वैभव जानकर, आबा धाईजे, दादासाहेब शिंदे, महादेव कोळेकर, अभिजित वळकुंदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.