माळशिरस तालुक्यातील मतदान यंत्रे सील
नातेपुते ः माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ९ व पंचायत समितीच्या १८ गणाच्या निवडणुकीसाठी आज मतदान यंत्रे सील करण्यात आली. ३६३ केंद्रांसाठी ३६३ तसेच १०८ राखीव, अशी एकूण ४७१ मतदान यंत्रे आज सील करण्यात आली. यासाठी ३७ क्षेत्रीय अधिकारी व ३७ ग्राम महसूल अधिकारी आणि ३७ ग्राम महसूल सेवक यांची ३७ टेबलावर नियुक्ती करण्यात आली होती. याखेरीज सुरक्षा कक्ष, ईव्हीएम, हजेरी ओळखपत्र वितरण, साहित्यवाटप आदी कामासाठी १५० हून अधिक, कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी उमेदवारांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. सकाळी ९.१५ वाजता काम सुरू होऊन संध्याकाळी ७ वाजता संपले. त्यानंतर सर्व मतदान यंत्रे सुरक्षा कक्षात ठेऊन उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत सुरक्षा कक्ष सील करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.