लोगो : माळशिरस तालुक
२६,३५० हेक्टर ऊस उपलब्ध;
पण बाहेरच्या कारखान्यांचा डोळा
जादा दराचे आमिष दाखवून ऊस गाळपासाठी नेण्याची शक्यता
सुनील राऊत : सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. १ : माळशिरस तालुक्यात पाच साखर कारखाने असून, त्यापैकी चार कारखाने तालुक्यातील उसावर १०० टक्के अवलंबून आहेत. श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखाना मात्र पंढरपूरच्या उसावर अवलंबून आहे.
अकलूज-शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, सदाशिवनगर येथील श्री. शंकर सहकारी साखर कारखाना, माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी व चांदापुरी येथील ओंकार शुगर मिल हे चार कारखाने तालुक्यात आहेत.
माळशिरस तालुक्यात २१ हजार ६८५ हेक्टर ऊस उभा असून, आडसाली उसाची लागण ४,६६५ हेक्टर आहे. म्हणजे एकूण २६ हजार ३५० हेक्टर ऊस आहे. या आकडेवारीचा विचार करता कारखाने सक्षमपणे चालू शकतात. मात्र, प्रत्यक्षात माळशिरस तालुक्यातील उसावर फलटण व बारामती कारखान्यांचा डोळा असतो.
यंदा गळीत हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पुणे जिल्ह्यातील भवानीनगर व माळेगाव, बारामती ॲग्रो तसेच फलटण तालुक्यातील शरयू, स्वराज व साखरवाडी हे सहा कारखाने जादा दराचे आमिष दाखवून तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी घेऊन जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम माळीनगर व सदाशिवनगर येथील कारखान्यांच्या गाळपावर होणार आहे.
अकलूजच्या कारखान्याला उसाचा तुटवडा जाणवत नाही. सद्गुरू श्री श्री रविशंकर साखर कारखाना, राजेवाडी (जि. सांगली), या कारखान्यालाही माळशिरस तालुक्यातील ऊस मोठ्या प्रमाणात जात असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.