Crime_Suicide 
पुणे

'मुलांना कोरोना होईल' या भीतीपोटी बापाने केली आत्महत्या, अन् बघा काय झालं?

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी (पुणे) : जगभर कोरोनाने थैमान घातले असताना पुण्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, याच भीतीतून भीमनगर येथील एका व्यक्तीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.२) उघडकीस आली आहे.

भीमनगर येथे राहणारे बळीराम जाधव (वय ५५) यांनी बुधवारी संध्याकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली. मागील आठवड्यापासून भीमनगर येथे रुग्ण वाढत आहेत. सर्व वस्तीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची चाचणी सुरू केली आहे. चाचणी केलेल्या व्यक्तींपैकी ३० ते ४० टक्के नागरिक कोरोनाने बाधित असल्याचे आढळले आहे. यामुळे वस्तीतील रोज शंभरएक लोकांची चाचणी केली जात आहे. बुधवारी बळीराम जाधव यांच्या मुलांची चाचणी करण्यात आली.

त्यानुसार अहवाल येईपर्यंत त्यांना ढोले पाटील रस्ता येथील महात्मा फुले शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. आमचा अहवाल आल्यावर तुमची चाचणी करूया असा निरोप देत त्यांची मुले चाचणीसाठी निघून गेली. वस्तीत अनेकांना कोरोना झाला आहे, आपल्याला पण होईल आणि आपल्या मुलांना झाला, तर काय करायचे? या धास्तीने जाधव यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सायंकाळी त्यांची पत्नी घरी आल्यावर पतीने आत्महत्या केल्याचे तिने पाहिले. आणि शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलवले, पण कोरोनाच्या भीतीने कोणी पुढे आले नाही. अर्ध्या तासानंतर पोलीस आल्यावर त्यांनी ससून रुग्णालयात नेले. तोपर्यंत त्यांचे हृदय चालू होते. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरात वाढत जाणारे रुग्ण यामुळे अनेक नागरिकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. कुठलेही लक्षण नसताना अहवाल सकारात्मक येत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. त्यामुळे अशा काही घटना घडत असल्याचे समोर येत आहे. 

बळीराम जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि तीन नातवंड असा परिवार आहे. कोरोनाच्या भीतीने त्यांच्या सुना आणि नातवंडे गावाला गेले आहेत. फक्त दोन मुले आणि पती पत्नी घरात राहत होते. बुधवारी तपासणीसाठी मुले गेल्यावर घरात एकटे वाटत होते. कोरोना झाला तर आपले काय होईल, अशी धास्ती निर्माण झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मुलांचा अहवाल येईपर्यंत तरी वाट पाहायला हवी होती, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT