man commits suicide after torture by wife and her relatives 
पुणे

बायको अपमान करायची; सात महिन्यांत पतीनं उचललं टोकाचं पाऊल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांकडून सातत्याने होणाऱ्या अपमानामुळे व मानसिक त्रासाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या सात महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसरमधील ससाणेनगर येथे 23 डिसेंबरला रात्री एक वाजता घडली. सतीश बापू गायकवाड (वय 22 , रा.साडे, करमाळा, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी ज्योती गायकवाड (वय 50) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीशला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची पत्नी, सासरे, मेव्हणा व मेहुणी यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीशचा सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. तो त्याच्या पत्नीसह ससाणेनगर येथे राहात होता. दरम्यान, सतीशची पत्नी, सासरे,मेव्हणा-मेहुणी हे त्याचा सातत्याने अपमान करीत होते. तसेच, त्याला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास देत होते. त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्याने 23 डिसेंबरला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या प्रकरणी सतीशच्या नातेवाईकांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार हडपसर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणी संजय राऊतांचा मोठा दावा, भाजपवर थेट इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT