Pune Road Accident 
पुणे

Pune Road Accident : मुंढव्यात दुचाकीवरून जात असलेल्या दोन मित्रांना टँकरची धडक; एकजण ठार

Road Accident In Mundhwa : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व त्याचा मित्र अमन याच्यासमवेत रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास केशवनगर भागातून दुचाकीवरून जात होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भरधाव पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मुंढव्यातील केशवनगर भागात रविवारी (ता. २८) मध्यरात्री घडली. अथर्व संजय कुंभार (वय २५, रा. केशवनगर, मुंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अमन विनोद चौधर (वय २३) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून टँकरचालक संतोष शिवसेवक सिंह (वय ३२, रा. केशवनगर, मुंढवा) याच्याविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व त्याचा मित्र अमन याच्यासमवेत रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास केशवनगर भागातून दुचाकीवरून जात होता. रेणुकामाता मंदिरापासून तीनशे ते चारशे मीटर अंतरावर टँकरने अथर्वला समोरून धडक दिली. या अपघातात अथर्व गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मुंढवा पोलिसांनी टँकरचालकास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महादेव लिंगे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pulwama attack: पुलवामा हल्ल्यासाठी ऑनलाईन स्फोटके खरेदी केले; FATF चा धक्कादायक खुलासा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना पोर्टल बंद, नव्याने पात्र महिला लाभापासून वंचित

Latest Maharashtra News Updates : आझाद मैदान मध्ये शिक्षकांचा आंदोलन, रोहित पवारांचा पाठिंबा

Narayangaon Crime : बनावट नवरी मुलीसह सात जणांची टोळी जेरबंद; सहा ते सात अविवाहित तरुणांची केली फसवणूक

Bike Taxi Service Ban: रॅपिडो बाईक टॅक्सी अखेर बंद, सर्वांचे लक्ष सरकारच्या 'ई-टॅक्सी'कडे

SCROLL FOR NEXT