Jogeshwari Police Station  esakal
पुणे

Mumbai News: धक्कादायक घटना! मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू, पोलिसांवर गंभीर आरोप

28-year-old Deepak Jadhav’s Suspicious Death at Jogeshwari Police Station Raises Questions : जोगेश्वरी पोलीस स्टेशनने या आरोपांचे खंडन केले असून, तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी हा एक अपघात असल्याचे म्हटले आहे आणि तपासानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, असे आश्वासन दिले आहे.

Sandip Kapde

मुंबईच्या जोगेश्वरी पोलीस स्टेशनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक जाधव (वय 28 वर्ष) या तरुणाचा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेले असताना मृत्यू झाला आहे. दीपकचा मृत्यू कसा झाला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, त्याच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे की पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे.

घटनेचा तपशील

दीपक जाधव हा केटरिंग व्यवसायात काम करत होता, आणि त्याने काही मुला-मुलींना कामावर ठेवले होते. मात्र, वेळेवर पगार न मिळाल्याने दीपक आणि त्याच्या कामगारांमध्ये वाद झाला होता. याच प्रकरणावरून दीपक जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. परंतु त्याच रात्री, पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा त्याच्या बहिणीचा दावा आहे.

पंचनामा आणि शवविच्छेदन

घटनेनंतर पोलिसांनी रात्री उशिरा नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत दीपकच्या मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दीपकच्या कुटुंबीयांचा असा आरोप आहे की पोलिसांनी तपास आणि पंचनाम्यात योग्य पारदर्शकता दाखवली नाही.

कुटुंबीयांचा संताप-

दीपकच्या बहिणीने स्पष्टपणे सांगितले आहे की पोलिसांच्या मारहाणीमुळेच तिच्या भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कुटुंबात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, जोगेश्वरी पोलीस स्टेशनने या आरोपांचे खंडन केले असून, तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी हा एक अपघात असल्याचे म्हटले आहे आणि तपासानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, असे आश्वासन दिले आहे. तर दीपकच्या कुटुंबीयांनी पोलीस विभागाच्या या खुलाशावर नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: कोविड संपून वर्षे झाली, मग 'हा' नियम अजून का? शुभमन गिल वेलिंग्टन कसोटीत विजय हुकल्यानंतर थेट ICC वर भडकला

Mangalwedha News : निंबोणी पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचाऱ्यांचा अभाव; तर तालुका पशुधन कार्यालय कुलूपबंद

आता कोणाच्या बापालाही घाबरत नाही'; बिग बॉस फेम संकेत पाठकचा राजकीय व्यक्तीवर संताप, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : बारामतीतील राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार, पोलिसांच्या तपासावर संशय

'सावरखेड एक गाव' फेम 'ही' अभिनेत्री आहे अमृता खानविलकरची बेस्ट फ्रेंड; वाढदिवसानिमित्त केलीये खास पोस्ट, म्हणते-

SCROLL FOR NEXT