burger
burger 
पुणे

बर्गरमध्ये काचेचे तुकडे (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पुणे - फर्ग्युसन रस्त्यावरील ‘बर्गर किंग’मध्ये बर्गर खाताना त्यामध्ये काचेचे तुकडे निघाल्याने एका ग्राहकाच्या घशाला जखमा झाल्याची घटना बुधवारी (ता.१५) दुपारी घडली. संबंधित ग्राहकाच्या मित्रांनी बर्गरची पाहणी केली, त्या वेळी त्यात काचेचे तुकडे आढळले. ग्राहकाने उपचार घेतल्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यात बर्गर किंग विरुद्ध गुन्हा दाखल केला.

साजिद आजमुद्दीन पठाण (वय ३१, रा. कुसाळकर बंगल्यासमोर, जुनी वडारवाडी) असे या ग्राहकाचे नाव आहे. डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण बुधवारी दुपारी तीन वाजता त्यांचे मित्र विजय चाचले, सागर बिलोर, रोहित भोसले यांच्यासमवेत फर्ग्युसन रस्त्यावरील ‘बर्गर किंग’मध्ये गेले. तेथे त्यांनी तीन मांसाहारी, एक शाकाहारी बर्गर, फ्रेंच फ्राईज व शीतपेय घेतले. पठाण बर्गर खात असताना त्यांच्या घशात काहीतरी टोचले. त्यांनी बर्गरचा घास काढून पाहिल्यानंतर त्यामध्ये काचेचे तुकडे आढळले. त्यानंतर पठाण यांना खोकला लागला आणि उलट्यांसह तोंडातून रक्‍त येण्याचा त्रास सुरू झाला.

तेथील महिला कर्मचाऱ्याने बर्गरमधून काचेचे तुकडे बाहेर काढले. दरम्यान, पठाण यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. पठाण यांच्या घरी कोणी नसल्यामुळे आणि तत्काळ उपचार घेणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी घटनेनंतर चार दिवसांनी रविवारी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

दरम्यान, डेक्कन पोलिसांनी ‘बर्गर किंग’चे विभागीय व्यवस्थापक, स्टोअर मॅनेजर व सुपरवायझर अशा तिघांविरुद्ध खाद्यपदार्थ देताना हयगय करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी काटे करीत आहेत.

तपास यंत्रणांना सहकार्य 
‘बर्गर किंग’ खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून आणि खाद्यपदार्थ तपासणीच्या सर्व तपासण्या पूर्ण करून उच्च प्रतीचे खाद्यपदार्थ ग्राहकांना देते. संबंधित घटनेची कंपनीमार्फत योग्य ती चौकशी सुरू आहे. याप्रकरणाचा तपास करणारे पोलिस प्रशासन व तपास यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ‘बर्गर किंग’ने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT