photo - indian express 
पुणे

Pune Breaking News : स्वत:ला IAS व PMO मध्ये पोस्टिंग सांगणाऱ्या तोतयाला पुण्यातून अटक

Sandip Kapde

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) नियुक्त भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी म्हणून भासविणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला औंध येथील एका चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ५४ वर्षीय तोतयागिरी करणाऱ्याला पोलिसांनी पकडले आहे.

इंडीयन एक्सप्रेस ने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव वासुदेव निवारुत्ती तायडे (५४ वर्ष) असे असून तो स्वत:ची ओळख डॉ. विनय देव अशी सांगत होता. तसेच पीएमओ कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत असल्याचे तो सांगत होता. अनेक गुप्तचर कामात गुंतला असल्याचा दावा त्यानी केला आहे. (Pune News)

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेने सोमवारी औंध परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते जिथे एका धर्मादाय उपक्रमाचा भाग म्हणून एक रुग्णवाहिका जम्मू-काश्मीरला पाठवली जाणार होती. यावेळी वासुदेव निवारुत्ती तायडे यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि त्याने दावा केला की तो आयएएस अधिकारी आहे. तसेच पीएमओ कार्यालयात कार्यरत आहेत. (Crime News)

संस्थेच्या विश्वस्तांना त्याची कृती आणि दावे संशयास्पद वाटले आणि त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. तपास सुरू केल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने त्या व्यक्तीचा शोध घेऊन चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. तळेगाव दाभाडे येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरण पालटले! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदेंना धक्का

Drug Disposal Pune : ड्रग माफियांना मोठा झटका ! पुणे अन् धुळ्यात मोठी कारवाई; ९,५३६ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट, मोठे रॅकेट उघड

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

SCROLL FOR NEXT