पुणे

मसूर : मानसिंगराव जगदाळे वाढदिवस लेख

CD

मा. मानसिंगराव जगदाळे वाढदिवस विशेष
........................................................

मसूरचे कर्तृत्ववान नेतृत्व ः मानसिंगराव जगदाळे

मसूरचे भाग्यविधाते, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व असलेले, जिल्हा परिषदेचे अर्थ, शिक्षण व क्रीडा समितीचे माजी सभापती व सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचे कट्टर कार्यकर्ते, मार्गदर्शक मानसिंगराव जगदाळे यांचा आज (गुरुवार) वाढदिवस. त्यानिमित्त...

- रवींद्र देविदास जाधव (सर),
मसूर


कऱ्हाड उत्तरचे भाग्यविधाते, यशवंत विचारांचे पाईक (कै.) पी. डी. पाटीलसाहेब यांच्या विचारसरणीतून मानसिंगराव जगदाळे यांचे नेतृत्व घडत गेले. माजी मंत्री बाळासाहेब पाटील व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या नेतृत्वाला झळाळी प्राप्त झाली. तरुणांपेक्षाही कित्येक पटीने त्यांचा सळसळता उत्साह, प्रशासनावर असलेली मजबूत पकड, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याच्या कौशल्यामुळे त्यांनी जनमानसात व प्रशासनात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात त्यांनी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे प्राथमिक शिक्षण विभागाला नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे. तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब त्यांच्याकडे आपला ‘हक्काचा माणूस’ समजून विश्वासाने आपल्या अडचणी सांगतात. दांडगा जनसंपर्क, नेहमी लोकहिताच्या कामासाठी धडपड, चिकाटी, संयम, सातत्य या अंगभूत गुणांच्या जोरावर अशक्य वाटणारी कामे त्यांनी स्वकर्तृत्वाने शक्य करून दाखवली आहेत. मसूरसह भागाच्या विकासासाठी ते सतत कार्यमग्न असतात. अव्याहतपणे राजकीय, सामाजिक, वाटचाल करणाऱ्या नेतृत्वास दीर्घायुष्यासाठी वाढदिवसाच्या आरोग्यदायी खूप खूप शुभेच्छा..


............
चौकट
......
विकासकामांचा झंझावात

* मसूरसाठी २४ बाय ७ शुद्ध पाणीपुरवठा योजना
* मसूर गावाची नवीन ग्रामपंचायत इमारत
* संपूर्ण राज्यांत ग्रामपंचायत पातळीवर सर्वप्रथम राबविलेला वैशिष्ट्यपूर्ण स्वच्छता उपक्रम
* मसूरसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मंजुरी
* सुसज्ज असा पशुवैद्यकीय दवाखाना
* सुसज्ज ग्रामीण रुग्णालयासाठी प्रशासकीय पातळीवर यशस्वी प्रयत्न
* विविध समाजाच्या स्मशानभूमीच्या सुधारणा
* गटार बांधणी, रस्ते बांधणी, पाणंद रस्ते सुधारणा
* बीओटी तत्त्वावर बांधलेले महाराष्ट्रातील पहिले एसटी स्टँड
* कोल्हापूर पद्धतीचा मातीचा आकर्षक कुस्ती आखाडा
* मसूरमधील सर्व गल्लीबोळातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण

...........
चौकट
.........


रोल मॉडेल पेयजल योजना

मसूरला १२ कोटी १७ लाख अंदाजपत्रकात मंजूर झालेल्या निधीतून शुद्ध पाणीपुरवठा हाेणार आहे. त्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत भविष्यात गावाची लोकसंख्या लक्षात घेता पाणीटंचाई भासणार नाही, यासाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूरला पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवनचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

.........
चौकट
........
‘जलजीवन’ची वैशिष्ट्ये

* पाणी संकटातून मसूरकरांची कायमची मुक्तता
* मसूरकरांना मिळणार २४ तास मुबलक शुद्ध पाणी
* येणाऱ्या ३५ वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून या योजनेचा आराखडा
* वीजबिलमुक्त जलजीवन योजना
* जलजीवन मिशन जुन्या जीआरमध्ये प्रतिव्यक्तीला पाण्याचा वापर प्रतिदिन ४० लिटरऐवजी ५५ लिटर ऐतिहासिक बदल

..........
चौकट
.......

‘पेयजल’चे काम गुणवत्तापूर्ण

पेयजल योजनेचे काम शिवरत्न कन्स्ट्रक्शन ॲण्ड अर्थमुव्हर्स यांना दिले आहे. या फर्मचे नरेंद्र जानुगडे व संभाजी पाटील यांनी कुशलतेने, अतिशय चांगल्या गुणवत्तेचे हे काम अंतिम टप्प्यात पूर्ण करत आणले आहे. ज्या ठेकेदाराने मलकापूरची आदर्श पेयजल योजना उभारली. त्यांनाच मसूरच्या पेयजल योजनेचे काम दिले आहे. वेळेत पेयजल योजना पूर्ण करत असल्यामुळे या योजनेच्या ठेकेदाराला ग्रामस्थ धन्यवाद देत आहेत. पेयजलच्या कामाच्या गुणवत्तेचाही आदर्श इतर ठेकेदारांनी घेणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.


..........
चौकट
........
कार्याचा आढावा...
* मसूरचे सरपंचपद १८८२ ते २००४ अखेर
* सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक
* राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून १९९९ ते २०१४ अखेर कऱ्हाड तालुकाध्यक्ष
* माजी सभापती, जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण समिती
* माजी उपाध्यक्ष, कऱ्हाड शेती व उत्पन्न बाजार समिती

.........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : बीड जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार! ​सिझेरियन करताना पोटातच सोडले ग्लोज; आतडे सडले अन् गर्भाशय काढावे लागले; १९ वर्षीय माता मरणाच्या दारात

Degloor Crime : अंध विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी ॲट्रॉसिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा

YouTube वर आता Views चा खेळ बदलणार! २४ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, नेमका काय झालाय बदल?

Mumbai Local : रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा! लोकलच्या डब्यावर चढण्याच्या प्रयत्नात ओएचईचा धक्का, घाटकोपरमध्ये लोकल १९ मिनिटे खोळंबली

Marathi News Live : क्रिकेट बुकीच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT